एक्स्प्लोर

राज्यात 81 हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी; कोकणसह मराठवाडा, विदर्भात होणार 20 हजार रोजगार निर्मिती

Maharashtra Cabinet Decision : राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पात इलेक्ट्रीक व्हेईकल, लिथियम बॅटरी, सेमी कंडक्टर प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

मुंबई : राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून 81 हजार 137 कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक धोरणानुसार सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत विविध प्रोत्साहने जाहिर करण्यात आलेली आहेत. 

आजच्या बैठकीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम आयन सेल/बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर, फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

याप्रकल्पांची माहिती अशी:

जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लि., यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्पासाठी गुंतवणुक. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. ५००० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. 

जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.

हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. १५०० कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा/पनवेल, जि. रायगड/पुणे/उर्वरीत महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे.  याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात रूपये १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार. ४००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे.

आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८००० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये रू. १७८५ कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळलाSantosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंNitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Embed widget