(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी रामाच्या नावाने मतं मागितली, आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
Maharashtra Budget Session : एखाद्याला बदनामी करताना कोणत्या थराला जायचं याचा विचार करा असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.
मुंबई: दाऊद कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. आधी यांनी रामाच्या नावावर मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागितली जातायत. आता त्याच्याही नावाने मतं मागणार का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. ते आज विधीमंडळात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग तो पाच वेळी निवडूण येतोय, मंत्री होतोय तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजलं नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसता थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करतायत का?"
देवेंद्रजी तुम्ही 'रॉ'मध्ये हवं होतं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "देवेंद्रजी तुम्ही रॉ, ईडी,सीबीआयमध्ये जायला हवंत, तुम्ही ईडीला नवाब मलिकांची माहिती दिली. मग त्यांना जाग आली. तुम्हीच जर त्या ठिकाणी गेला तर त्यांचं काम वेगाने होईल. ही ईडी आहे की घरगडी आहे तेच समजत नाही."
दाऊदला घरात घुसून मारा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपने आधी रामाच्या नावाने मतं मागितली. आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? मग तो दाऊद आहे कुठं हे कुणालाच माहिती नाही. ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? निवडणुकीत त्याचा वापर केला होता का? ओबामांनी ओसामाला त्याच्या घरात घुसून मारलं हा मर्दपणा. जा घुसा आणि त्या दाऊदला मारा, याला म्हणतात मर्दपणा."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "आज तुम्ही नवाब मलिाकांचा राजीनामा मागताय. पण अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्या मुफ्तीसोबत सत्तेत भाजप बसले. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाठ मांडला होता."
संबंधित बातम्या :
-
कुटुंबियांना का त्रास देताय? जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान
-
रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काही जणांचा जीव मुंबईत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- CM Uddhav Thackeray : राज्यपाल, मद्यराष्ट्राचा विरोध ते दाऊदबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? जाणून घ्या भाषणातील 10 मुद्दे