एक्स्प्लोर

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत. अशातच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Tehsildars Transfers : अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मुद्यावरुन सभागृह तहकूबही करण्यात आलेलं होतं. सरकारच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश  प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरुही आहेत. मात्र, अशातच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या (Tehsildars Transfers) करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार आणि इतर यंत्रणावरती आहे. अशातच 36 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. अचानक बदल्या केल्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय. दरम्यान, कालच विधनसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावरुन देखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच कांदा प्रश्न आणि अवकाळी पाऊस या दोन्ही मुद्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. 

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान 

पालघर 

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात या भागात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यामध्ये गहू, भाजीपाला, आंबा पिकांचा समावेश आहे.

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

धुळे 

धुळे जिल्ह्यात 3 हजार 144 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.  मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी पिकांचे नुकसान झाले आहे. 

नंदूरबार 

नंदूरबार जिल्ह्यात 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये मका, गहू हरभरा,  ज्वारी, केळी, पपई ,आंबा या पिकांचं नुकसामन झालं आहे.

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

जळगाव 

जळगाव जिल्ह्यात 214 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठं नकुसान झालं आहे. 

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. 

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात 775 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. 

वाशिम

वाशिममध्ये 475 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या 

राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis : अवकाळीचा तडाखा, आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; फडणवीसांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपयेKaruna Sharma on Dhananjay Munde : 6 महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 15 March 2025Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
Embed widget