(Source: Poll of Polls)
Maharashtra Budget 2023 : पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अर्थसंकल्प नसावा, सामान्य लोकांचा अर्थसंकल्प हवा : रोहित पवार
Maharashtra Budget 2023 : हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना गृहीत धरुन मांडला जाईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) आज त्यांचा पहिलाच अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना गृहीत धरुन मांडला जाईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं हे बजेट मांडू नये. सामान्य लोकांचं बजेट असावं असेही रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar : नेमकं काय म्हणाले रोहित पवार
आज मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगार यांना गृहीत धरुन मांडला जावा अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी आपण पाहिलं पुरवणी मागण्या झाल्यानुसार काहीही या सरकारने केलं नाही. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं हे बजेट मांडू नये असेही रोहित पवार म्हणाले. सामान्य लोकांचं हे बजेट असावं. मुंबईवर जास्त फोकस असण्याची शक्यता आहे. मात्र ते करताना सर्वच शहरत चांगले प्रोजेक्ट राबवावे असे रोहित पवार म्हणाले.
सरकारनं कामांवरील स्थगिती उठवावी
दरम्यान, सरकारनं ज्या कामांना स्थगिती दिली आहे, त्यावरील स्थगिती उठवावी अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेले 60 टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक पाहणी अहवालत मोठी घट सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यावर या सरकारनं लक्ष द्यायला हवं असे रोहित पवार म्हणाले. ज्या-ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तिथं चांगला निधी दिला जाईल असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस प्रथमच अर्थसंकल्प मांडणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर करणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शहरी भागातील नागरिकांना दिलासा देताना कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा हा अर्थसंकल्प नाही तर महाअर्थसंकल्प असणार असल्याचे म्हटले होते. अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, यासाठी फडणवीस यांनी सर्व मंत्री, सचिव, उद्योग संघटनांसोबत चर्चा केली होती. पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.