Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Nashik Crime : देशी बनावटीचे पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला बेड्या; नाशिक पोलिसांची कारवाई
नाशिक : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि आठ जिवंत काडतूस बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी उपकरण चौधरी हा उत्तर प्रदेशातील आहे. त्याच्या ताब्यातून एक चारचाकी देखील हस्तगत केली असून एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा मध्यमाल ताब्यात घेतला आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या या इसमाविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Buldhana News : मनसेच्या वाशिम जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; पक्षांतर्गत कलहाचा आरोप
बुलढाणा : पक्षाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष, पक्षांतर्गत कलहाचा आरोप करत मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी राजीनामा दिला आहे. सोबतच विधी विभाग, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना शहर, तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राजीनामा देत आहे, असं पत्र मनीष डांगे यांनी दिले आहे.
Suresh Dhas : सुरेश धस यांनी केली अजितदादांकडे बोगस रस्त्याच्या कामाची तक्रार
सुरेश धस यांनी बोगस रस्त्याच्या कामाची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली
यावर अजित पवार सुरेश धस यांना म्हणाले की, लेखी तक्रार करा.
सुरेश धस यांनी जिल्ह्यातील विकास निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली आहे.
Aaditya Thackeray : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आदित्य ठाकरे अनुपस्थित राहणार
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आदित्य ठाकरे अनुपस्थित राहणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक होणार
एकनाथ शिंदेंसमोर आदित्य ठाकरेंनी येणं टाळलं?
आदित्य ठाकरेंसोबत अनिल परब, अरविंद सावंत, अनिल देसाई देखील अनुपस्थित असणार
भाजपच्या चित्रा वाघ सुद्धा गैरहजर राहणार
Pune Crime : ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीची दोन वाहने जाळली; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे : प्रेयसीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर पुण्यात प्रियकराने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली. पुण्यातील रामटेकडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमजद पठाण असे प्रेयसीच्या वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. पठाण याचे त्याच्या परिसरात असणाऱ्या एका महिलेसमोर प्रेम संबंध होते. परंतु, काही दिवसापासून त्याची प्रेयसी त्याच्याशी बोलत नव्हती. यामुळे संतापलेल्या पठाण याने घरासमोर असलेल्या दोन गाड्या पेट्रोल टाकून पेटवल्या. याप्रकरणी आरोपी अमजद पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
