Maharashtra Breaking News Live Updates : मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता, यावेळी कठोर निकष लावले जाणार
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : राज्यात महायुतीच्या नव्या सरकारची स्थापना झालेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता सरकारची स्थापना झाल्यानंतर सर्वांनाच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असेल? याची उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत. दुसरीकडे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. जागोजागी लोक शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. आज 6 डिसेंबर आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण झाले होते. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्याने जमा झाले आहेत. या प्रमुख घडामोडी तसेच राज्यातील इतरही घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिवकर...
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता, यावेळी कठोर निकष लावले जाणार
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता
कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार -सूत्र
पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान -सूत्र
पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय याचा विचार केला जाणार-सूत्र
निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचार केला जाणार-सूत्र
ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही-सूत्र
नाशिक शहरात चेन स्नॅचिंग घटनांचा आलेख वाढता, पाच दिवसात 11 चेन स्नॅचिंग
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिक शहरात चेन स्नॅचिंग घटनांचा आलेख वाढता...
- शहरात गेल्या पाच दिवसात 11 चैन स्नॅचिंगच्या घटना यात साडेपाच लाखाहून अधिकचा ऐवज चोरी...
- पोलीस गस्तीवर असताना चेन स्नॅचिंग, पोलिसांना हुलकावणी देत चोरटे फरार...
- नाशिक शहरात इराणी टोळी असल्याचा संशय,पोलिसांकडून इराणी टोळीचा शोध सुरू...
- शहर पोलिसांची स्टॉप अँड सर्चची मोहीम गतिमान...
- शहरात वाहतूक पोलिसांसह शहर पोलीस आणि होमगार्ड ठिकठिकाणी तैनात...
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक
महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली
प्रफुल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात १ तास बैठक
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा
बैठकीत ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती
काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप, राज्यसभा सभापतींनी दिली माहिती
राज्यसभेच्या सभागृहात गदारोळ
काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप
काल रात्री झालेल्या तपासणीत नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप
राज्यसभा सभापतींनी दिली माहिती
आरबीआयकडून थोड्याच वेळात पतधोरण जाहीर करण्यात येणार
आरबीआयकडून थोड्याच वेळात पतधोरण जाहीर करण्यात येणार
गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी १० वाजता पतधोरण जाहीर करतील
रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे
मात्र, वाढता महागाई दर आणि धीम्यागतीनं आर्थिक विकास दराला गती देण्यासाठी रोख राखीव प्रमाण (CRR) मध्ये समायोजनाची शक्यता आहे
शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातील ही अंतिम पतधोरणाची बैठक आहे
दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपतोय