Maharashtra Breaking News LIVE Updates : उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात करणार बीड आणि परभणी दौरा
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
LIVE
Background
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील सोमनाथ शूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूनंतर राज्यसरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. तर बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचा दावा केला जात असून धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली जात आहे. या तसेच राज्य, देशातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात करणार बीड आणि परभणी दौरा
उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात करणार बीड आणि परभणी दौरा
दोन किंवा तीन जानेवारीला उद्धव ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाऊन सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती
बीड आणि परभणीतील एकीकडे तपास सुरू झालेला असताना या सगळ्या प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते सुद्धा बीड आणि परभणी दौऱ्यात त्यांच्या सोबत असतील
शरद पवार आणि राहुल गांधी यांनी दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा बीड आणि परभणी दौऱ्यावर जाऊन या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणार
दोन मुलींचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील अजय दास याला बेड्या, परराज्यात पळून जात असताना बेड्या ठोकल्या
पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये शेजारीच वास्तव्यास असणा-या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खुन केल्या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आलीय अजय दास असे नराधम आरोपीचे नाव
नराधम आरोपीने मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी पुण्यातून आरोपीला अटक केलीय.
कल्याण हत्याप्रकरणी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण हत्याप्रकरणी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी
निकृष्ट दर्जाचे काँक्रिट रोड बांधल्याने कंत्राटदारांना पालिकेच्या वतीने आतापर्यंत 50 लाखांचा दंड
निकृष्ट दर्जाचे काँक्रिट रोड बांधल्याने कंत्राटदारांना पालिकेच्या वतीने आता पर्यंत ५० लाखांचा दंड
तसेच रस्त्यांची देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्वालिटी मैनेजमेंट एजेंसीना ही दंड थोटविण्यात आला आहे
योग्य काम न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि दंड ठोठावला आहे..
मुंबई महापालिकेच्या वतीने कॅालिटीचेकसाठी कठोर कारवाई करण्यात आली
आमदार सुरेश धस यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी चुकीचे आरोप करू नये - व्यापारी अमोल डुबे
आमदार सुरेश धस यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी चुकीचे आरोप करू नये - व्यापारी अमोल डुबे
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन परळीतील व्यापारी अमोल डुबे प्रकरणात त्या कुटुंबांची भेट घेणार असल्याचं सांगितल. मात्र या प्रकरणात आम्हाला मुंडे कुटुंबीयांनी मदत करून पोलिसांनी सहकार्य केलं याचे आमदार सुरेश धस यांनी राजकारण करू नये असे डुबे यांनी म्हटल आहे. सुरेश धस चुकीची माहिती माध्यमांना देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार करत असल्याच देखील अमोल डुबे यांनी म्हटले आहे.