Maharashtra News Live Updates : मविआमधील धुसफुस कायम, विदर्भातील जागांवर अजूनही रस्सीखेच सुरूच, सूत्रांची माहिती
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्या विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटपावर चर्चा होत आहे. या दोन्ही आघाड्यांतील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या दोन्ही आघाड्या आपले जागावाटप जाहीर करू शकतात. दुसरीकडे ज्या नेत्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, ते प्रचाराला लागले आहेत. तर तिकीट मिळण्याबाबत धाकधूक असणारे नेते ते मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तिकीट मिळण्याच शक्यताच नसल्याचे लक्षात आल्यामुळे अनेक नेतेमंडळी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर....
गेवराई विधानसभा मतदारसंघातून वंचितचा उमेदवार जाहीर, मराठा उमेदवारासमोर ओबीसी चेहरा देऊन वंचितची खेळी
बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने पहिली उमेदवारी जाहीर केलीय. प्रियंका खेडकर या वंचितच्या उमेदवार असून त्यांनी आज प्रचाराला चकलांबा गावातून सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर प्रामुख्याने दिसून आला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अटळ असणार आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि पवार या दोन राजकीय कुटुंबात सत्ता राहिलेली आहे. आता अशातच प्रस्थापितांविरोधात नवे चेहरे दिले जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलले आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडी कडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच वंचितने उमेदवार दिला आहे. प्रियंका खेडकर या सध्या चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच गेवराई मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. पवार आणि पंडित या दोघांविरोधात वंचित ने ओबीसी चेहरा देऊन त्यांना आव्हान दिले आहे.
नांदेडमधील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा आज स्वराज्य पक्षात प्रवेश
नांदेड मधील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा आज स्वराज्य पक्षात प्रवेश
सुभाष साबणे 1999,2004,2014 या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे.
शिवसेनेच्या उमेदवारीवर सुभाष साबणे जिंकून आलेले आहेत.
सध्या ते भाजपमध्ये होते.भाजप सदस्यत्वाचा काल राजीनामा देत आज स्वराज्य पक्षात प्रवेश केला
परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार
मविआमधील धुसफुस कायम, विदर्भातील जागांवर अजूनही रस्सीखेच सुरूच, सूत्रांची माहिती
मविआमधील धुसफुस कायम, विदर्भातील जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती
विदर्भातील जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अजूनही आडून शिवसेना आणि काँग्रेसचे जागावाटपात जमेना
काल १० तास बैठक होवूनही जागावाटपावर तोडगा नाही
शिवसेना ठाकरे गटाने बोलावली तातडीची बैठक, बैठकीत ज्या जागांवर तिढा आहे त्यात जागांवर पक्षांतर्गत चर्चा केली जाणार
मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक
मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाच्या नेत्यांची बैठक
जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत होवू शकते चर्चा
शरद पवार पक्षाच्या कोअर कमिटीची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक
सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक
यानंतर दुपारी १ वाजता पुन्हा पार्लमेंट्री बोर्डाची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आयोजन
शनिवारी पार पडलेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत ५८ उमेदवार अंतिम झाल्याची माहिती देण्यात आली होती
आज पार पडणाऱ्या बैठकीत उरलेल्या २७ उमेदवारांची माहिती देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती