Maharashtra News Live Updates : बदलापूरच्या शाळेत मुलींच्या ब्ल्यू फिल्म बनवायचे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आम्ही महायुतीतील घटकपक्ष एकत्र आहोत, असे महायुतीकडून सांगितले जात आहे. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पक्षातील नेत दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच नेत्यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. संभांमध्ये अनेक नेते विरोधकांवर गंभीर टीका करत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
बदलापूरच्या शाळेत मुलींच्या ब्ल्यू फिल्म बनवायचे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूर येथील शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचारची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असून या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफिती तयार करणे, अवयव विक्री करणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका जाहीर सभेत केला आहे. हा आरोप त्यांनी नांदेड येथील वाजेगाव येथील जाहीर सभेत केला आहे. आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.
महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध
पालघर -
महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे पालघर उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध .
प्रचार रॅलीसाठी गेलेल्या गावितांना मुरबे येथील ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत केला निषेध .
वाढवण बंदर विरोधात गावित यांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप .
काळे झेंडे दाखवत गावित यांची प्रचार रॅली रोखली .























