Maharashtra Breaking 7th August LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 7th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 7th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा, जागावाटपावर अजून चर्चाच झाली नसल्याचं स्पष्टीकरण
2. विधानसभेच्या मोर्चेंबांधणीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची घेणार भेट
3. महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची आज बैठक, विधानसभेसाठी किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा यासंदर्भात होणार चर्चा
4. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक, देवस्थानच्या जमिनीची वर्गवारी बदलण्याबाबत निर्णय अपेक्षित, विविध योजनांचाही आढावा
5. क्रॉस व्होटिंगच्या संशयामुळे चर्चेत आलेले हिरामण खोसकर घेणार नाना पटोलेंची भेट, तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव
Mira Road : ओव्हरटेक करण्याच्या नादात महिलेचा मृत्यू
Mira Road : मिरा रोड : मिरा रोड येथील गौरव वुड्स फेज 2 येथील गौरव सिटी गेटजवळ पाण्याच्या टँकरला स्कूटी चालक महिला ओव्हरटेक करत असताना झालेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 6 ॲागस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता एका महिलेने स्कूटीसह पाण्याच्या टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिच्या समोरून एक ऑटो आली आणि तिचा तोल गेला.
स्कूटर उलटल्याने स्कूटरच्या मागे बसलेल्या 39 वर्षीय वैभवी दिलीपभाई देसाई यांच्या डोक्याला टँकरने जोरदार धडक दिली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कनकिया पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Congress Meeting : काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक
Congress Meeting : काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक
मविआसमोर किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा यावर चर्चा
जागांच्या प्रस्तावाबाबत आज काँग्रेस नेते करणार चर्चा























