(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Live Updates : नरेंद्र मोदींकडून पोहरादेवीची आरती, तर राहुल गांधी कोल्हापुरात सभास्थळी पोहोचले
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन सध्या राज्यातील नेतेमंडळी कामाला लागले आहेत. राज्य सरकारकडून अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भविष्यातदेखील अनेक नेतेमंडळी पक्षबदल करणार आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोहरादेवीची पूजा
पंतप्रदान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्याकडून पोहरादेवीची पूज केली जात आहे.
तर दुसरीकडे राहुल गांधी हे कोल्हापुरात पोहोचले आहेत.
ते सभास्थळी मंचावर बसले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गडावर पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत.
पोहरादेवी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यात अचानक बदल, कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी उचगावमधील काँग्रेस कार्यकर्त्याची घेतली भेट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यात अचानक बदल
कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी उचगाव मधील काँग्रेस कार्यकर्त्याची घेतली भेट
उचगाव मधील अजय संधे या कार्यकर्त्याच्या घरी पाऊण तास बैठक
अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मात्र पोलिसांची तारांबळ
हराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट
धुळे : शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल गोटे यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्हा विषयी आमची चर्चा झाल्याची संजय राऊत यांची माहिती
अनिल गोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जवळपास 20 मिनिटे बंद दाराआड अनिल गोटे आणि संजय राऊत यांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन, पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान
नांदेड :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आज शनिवारी ५ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी १०.३० वाजता आगमन झाले.
गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमनानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण,खा.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर,आ.भीमराव केराम,आ.डॉ. तुषार राठोड,आ.राजेश पवार,पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. १०.३५ ला ते पोहरादेवीकडे रवाना झाले.
सकाळी ११ वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पोहरादेवी येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.
प्रधानमंत्र्यांचा पोहरादेवी येथील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे...
सकाळी ११ ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी ११.१५ वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी ११.३० वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी १२.५५ वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून १.४५ वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.५० ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील.