मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात
Maharashtra Live News : Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वेध लागले आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच सध्या राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी चालू आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) या दोन्ही युत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा चालू आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच पुणे आणि मुंबई यासारख्या प्रमुख शहरांत परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील या प्रमुख घडामोडींसह देश तसेच जगभरातील इतरही प्रमुख घडांमोडीचे अपडेट वाचा एका क्लिकवर...
Nashik : एल्गार कष्टकरी संघटनेचा इगतपुरी येथील पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा
नाशिक : इगतपुरी येथील पंचायत समितीवर एल्गार कष्टकरी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. या मोर्चात महिलांचा आपल्या लहान लेकरांना घेत मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यातील बेघर आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेकडो चकरा मारून व फॉर्म भरून देखील लाभ मिळत नाही त्यामुळे पंचायत समितीच्या आवरातच चूल पेटवत ठिय्या मांडण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. गेल्या पाच तासांपासून हा मोर्चा सुरु आहे. चर्चा होऊनही मार्ग न निघाल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत.
मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग:
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात
धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे झाला अपघात
पिकप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून धडक दिल्याने झाला अपघात
अपघातात संजना जाधव, चालक कार्यकर्ते थोडक्यात बचावलेला
कन्नड येथून इच्छुक संजना जाधव यांच्या गाडीचा अपघात


















