Maharashtra Breaking 2nd July LIVE Updates: लोकसभेतून नरेंद्र मोदी लाईव्ह, विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधानांकडून उत्तर

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 02 Jul 2024 02:02 PM
Mumbai News : 300 युनिट वीज मुंबईकरांना मोफत देण्यात यावी; ठाकरे गटाचं आंदोलन

Mumbai News :  गेल्या काही दिवसात वीजेच्या बिलाचा चांगलाच झटका मुंबईकरांना बसला आहे. त्यामुळे वीज दर कमी करावे तसेच 300 युनिट विज मुंबईकरांना मोफत देण्यात यावी या मागणीसाठी आज मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन झाले. परळ येथे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर विभाग प्रमुख आशिष चेंबुरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.मुंबईकरांना वीज बिलात दिलासा द्यावा अथवा हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल अशी चेतावणी या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली.

Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेच्या वतीनं राज्यभर धरणं आंदोलन

Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेच्या वतीने आज राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपुरात देखील जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. राजपत्रित मुख्याध्यापक आणि उपशिक्षणाधिकारी यांची पदोन्नती शिक्षकातून सेवजेष्ठते नुसार करण्यात यावी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा आणि जुनी पेन्शन द्यावी यासारख्या 21 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

Ahmednagar News: संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी नगरमध्ये दाखल

Ahmednagar News: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे अहमदनगरच्या पिपंळगाव माळवी येथून अहमदनगर नगरकडे प्रस्थान ठेवले आहे...या दिंडीमध्ये जवळपास 60 हजार वारकारी सहभागी झाले आहेत. जवळपास 46 छोट्या दिंडी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या असून संत निवृत्ती महाराज यांची दिंडी आज सायंकाळी सहा वाजता अहमदनगरच्या मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मुक्कमी असणार आहे. अत्यंत भक्तीमय वातावरणमध्ये दिंडी नगरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. शासन-प्रशासनाकडून यंदा दिंडी सोहळ्यात सर्व सुविधा दिल्या गेल्याचे दिंडी प्रमुखांनी सांगितले, मग त्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था देण्यात आलीये त्यामुळे यंदा निर्मळ वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा मिळाल्याने वारीच्या वाटेवर असलेल्या गावात वारी गेल्यानंतर अस्वच्छता होणार नाही असं दिंडी प्रमुखांनी सांगितले.

Gondia News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी महिलांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी

Gondia News: मध्यप्रदेश सरकारच्या 'लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली आहे. महिलांना या योजनेसाठी 15 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी गोंदिया जिल्हातील सेतू केंद्र, तलाठी कार्यालय व तहसिल कार्यालयात तुफान गर्दी केले आहे. तर कागदपत्रांना वेळ लागत असल्याने नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. 

Nashik News: नाशिक शहरातील चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना 300 युनिट वीज मोफत मिळावी; शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन

Nashik News: आज नाशिक शहरात ठाकरेंच्या शिवसेने कडून आंदोलन करण्यात आले होते. नाशिक शहरातील चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना 300 युनिट वीज मोफत मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते आज प्राथमिक स्वरूपात आंदोलन करण्यात आले  मात्र येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून मागणी मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाडू असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलाय.

Navi Mumbai: खारघरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही

Navi Mumbai: खारघर येथील पापडीचा पाडा येथे रस्त्याच्या कडेला लावलेला भलामोठा जाहिरात होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेय. सुदैवाने रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने यादुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सोसाट्याचा वारा सुटल्याने हा जाहिरात होर्डिंग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पनवेल मनपातर्फे तात्काळ हा होर्डिंग बाजूला काढण्यात आलाय. मात्र सदर होर्डिंग अधिकृत होता का, या होर्डिंगचा स्ट्रकचरल ऑडिट झालेला का असा प्रश्न उपस्थित करत दोषीवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Beed News: परळी गोळीबार प्रकरण; पिस्टल, कोयते जप्त, पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

Beed News: बीडच्या परळी शहरातील बँक कॉलनीत बोलावून घेऊन पैशाच्या कारणावरून मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळी झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा आणि कोयते जप्त करण्यात आले आहे. 


मुख्य आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून केज आणि धारूर पोलिसांनी आसाराम दत्ता गव्हाणे, मयूर सुरेशराव कदम, रजतकुमार राजेसाहेब जेधे, अनिल बालाजी सोनटक्के या चौघांना ताब्यात घेतले. त्यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली. माञ अजूनही मुख्य आरोपी असलेले शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत.

Buldhana Accident: घात की अपघात....? मलकापूर जवळ कार ने इसमास चिरडलं; भारतीय न्याय संहितेनुसार पहिला गुन्हा दाखल

Buldhana Accident:  मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कुंड बुद्रुक येथील रहिवासी असलेले व पोलिस पाटील नामदेव तुकाराम कवळे (58) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हॉटेल यादगारनजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव (जीजे-15, बिएफ-2564) चारचाकी वाहनाने कवळे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीस मलकापूर येथील उपजिल्ह रुग्णाल्यात भरती केले असता ते मृत घोषित करण्यात आले. मात्र कार चालक कवळे याना धडक देऊन फरार झालाय. हा सर्व अपघात सीसीटिव्ही त कैद झाला असून. नेमका हा घात की अपघात अशी चर्चा आता सुरू आहे. मलकापूर पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा दाखल केला असून कार चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

Jalna News: मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी

Jalna News: जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेरा द्वारे टेहाळणी होत असल्याच समोर आलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या सरपंचाच्या घरावरती देखील हे ड्रोन उडाल्याच सांगितलं जातय, तीन दिवसा पूर्वी देखील असाच प्रकार घडल्याच सांगण्यात येतेय, दरम्यान गावच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी सरपंच तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. मागील आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशाच प्रकारे प्रकारची टेहाळणी झाल्याचं समोर आल होत.

Indrayani River:  मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशी ही इंद्रायणी फेसाळलेलीचं. प्रदूषण मंडळाचा दावा पुन्हा फोल.

Indrayani River: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देवाच्या आळंदीतील इंद्रायणीला मोकळा श्वास देण्याचा विडा हाती घेतलाय. याचसाठी मुख्यमंत्र्यांनी पालखी प्रस्थानादिवशी स्वतः इंद्रायणीची पाहणी केली. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला ही गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कारण हा जीवघेणा फेस प्रदूषण मंडळाच्या नजरेस पडतचं नाही. काल याचं प्रदूषण मंडळाने सर्व्हेक्षण केलं अन इंद्रायणी नदी स्वच्छ वाहत असल्याचं थेट सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांना कळवलं. पण हे कळवताना फोटो मात्र इंद्रायणी घाटालगतच्या नदीचे दिले. प्रत्यक्षात आळंदी बंधाऱ्याजवळ नदी आज ही फेसाळलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याने तोंडाला फेस आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशी खोटी माहिती देत, थेट मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली. आजवर प्रदूषण मंडळाच्या निष्क्रियतेमुळं इंद्रायणी नदी अशी विषारी बनलीये. मात्र याचं सोयरसुतक या प्रदूषण मंडळाला नाही आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री ही वारी आल्यावरचं फक्त वारकऱ्यांबाबत कळवळा दाखवतात. सरकारने प्रदूषण मंडळाला आत्तापर्यंत ठिकण्यावर आणलं असतं तर मुख्यमंत्र्यांवर पाहणी दौरा करण्याची वेळ आलीच नसती. सरकारची हीच उदासीनता गेली सात वर्षे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतेय. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणी फेसाळलेली आहे. हे पाहता इंद्रायणी कायमस्वरूपी मोकळा श्वास घेणार नाही, हे आजवरचा इतिहास सांगून जात आहे.

Vijay Mallya: विजय मल्ल्याविरधोत आणखीन एक अजामीनपात्र वॉरंट जारी


Vijay Mallya: विजय मल्ल्याविरधोत आणखीन एक अजामीनपात्र वॉरंट जारी



मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं जारी केलं वॉरंट


इंडियन ओव्हरसिज बँकचं 180 कोटींचं कर्ज बुडवल्याप्रकरणी कोर्टाची कारवाई


किंगफिशर एअरलाईन्सला साल 2007 ते 2012 दरम्यान देऊ केलेल्या कर्जाची भरपाईच झालेली नाही


दिलेल्या कर्जाची रक्कम मल्ल्यांनी इतर कामांत वापरल्याचा ठपका


बँकेताल सर्वसामान्यांचा पैसा अश्याप्रकारे बुडवणा-या फरार गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाईची गरज - न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात शेखरू दुर्मिळ प्राण्याचं दर्शन

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात शेखरू या दुर्मिळ प्राण्याचे दर्शन झाले आहे. लांजा तालुक्यातील भांबेड या गावी हे शेखरु आढळून आलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होत आहे. शेखरूचं झालेलं दर्शन हे लांजा तालुक्यात असलेल्या जैवविविधतेत भर घालणारी आहे.

Mumbai Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब विजयी

Mumbai Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधर मतदारसंघात विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेतल्या 
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा 26 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यानं विजय झालाय. या निवडणुकीत अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला. अनिल परबांच्या विजयामुळं ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं.

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे 5, एकनाथ शिंदेंची शिवसेना 2, काँग्रेस 1, महाविकास आघाडीची आणखी एक जागा निवडून येऊ शकते. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 उमेदवार दिले जाणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी किती अर्ज दाखल होतात यावर निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार हे पाहावं लागेल. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


वाचा सविस्तर 

MLC Election 2024: उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात? मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स

मुंबई: एकेकाळी उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अशी ओळख असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या 11 व्या जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा काल रंगली होती. मात्र, काहीवेळातच मिलिंद नार्वेकर हे अर्ज भरणार नसल्याची बातमीही ठाकरेंच्या गोटातून (Uddhav Thackeray Camp) समोर आली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election 2024) उमेदवारीवरुन काहीवेळ संभ्रम निर्माण झाला आहे. या जागेवरुन ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी संध्याकाळी अचानक मिलिंद नार्वेकर यांचे नाव अचानक चर्चेत आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. ठाकरे गटाकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात न आल्याने याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.


वाचा सविस्तर 

Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी

Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) विजयी झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला. 


वाचा सविस्तर 

Parbhani News : परभणी बॉम्बशोधक पथकातील गुणी श्‍वान रिओचे निधन

Parbhani News : परभणी पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील अत्यंत गुणी असा श्‍वान रिओ याचे सोमवारी अल्पशा आजाराने उपचार सुरु असतांना निधन झाले.श्‍वान रिओ याने मागील सात वर्षात अनेक महत्त्वाच्या कामात जसे की, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री व व्हीआयपी दौर्‍यादरम्यान तसेच ईद सारखे जमावाचे सन-उत्सव, रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील नियमित पाहणी करण्यात घातपात विरोधी तपासणी करण्यास पोलीस दलाला सहकार्य केलेले आहे. तसेच पोलीस दलातील कर्तव्य मेळाव्या सारख्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून परभणी पोलीस दलाचे चांगल्या प्रकारे नाव उंचावलेले आहे. दहशतवादी कार्यवाही बाबतच्या डेमो देताना उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे. अत्यंत गुणी, शांत असा हा श्‍वान होता.पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्याचे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सिता वाघमारे व तसेच पोलीस शिपाई साहेबराव तोटेवाड यांनी काळजी घेऊन हँडलर म्हणून कर्तव्य बजावलेले.त्याचे निधन झाल्यांनतर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.






 




Parbhani News: परभणी जिल्ह्यातील नवीन कलमांन्वये पहिला गुन्हा दाखल

Parbhani News: 1 जुलैपासून देशभरात लागू झालेल्या नवीन कलमांनुसार परभणीत पहिला गुन्हा दाखल व्हायला रात्रींचे साडे नऊ वाजले असुन सरकारी कामात अडथळा केला म्हणुन नव्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल गुन्ह्यात पहिले या गुन्ह्यातील कलम हे 353,332,186 आणि 333 असे होते हेच आता गुरन 121/2024 कलम 132,121(1)189,(2),191,(2),191,190,221 भारतीय न्याय सहिता अधिनीयम 2023 अन्वये शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी, भाजपच्या किरण शेलार यांचा 26 हजार 26 मतांनी पराभव.बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण, विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया 


2. मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत शिवसेनाच, अनिल परबांनी विरोधकांना ठणकावलं, तर पदवीधरची यादी पाठवतो, बघा किती मुस्लिम, परबांचा टोला.


3. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अनिल परब यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,  ठाकरेंकडून अनिल परब यांचे अभिनंदन.


4. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजय झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष, भरपावसाच अनिल परब यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांचा डान्स


5. ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचीत आमदार अनिल परब यांनी निवडणुकीत पैशांचा वापर केला, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप.


6. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार ज.मो.अभ्यंकर यांचा विजय,  शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचा 4 हजार 83 मतांना पराभव


7. मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विजयी,  विजयानंतर नवी मुंबई मतदान मोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा 


8. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं यश, शिवसेना भवनासमोर जल्लोष

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.