Maharashtra Breaking 28th June LIVE Updates: सोलापुरात चोऱ्या, घरफोड्या, मोटारसायकल चोरणाऱ्या सात चोरट्यांना बेड्या
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा
2. राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
3. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध, आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका
4. अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक, अजितदादांनी घेतली माहिती
5. पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचं नावही चर्चेत
Beed News: बीड: शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर मुंडे समर्थक आक्रमक
Beed News: बीडमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे महायुतीत असताना देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचं काम केले असल्याची कबुली एका कथित ऑडिओ क्लिप दिली. या ऑडिओ क्लिप नंतर सध्या बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच कुंडलिक खांडे यांच्या विरोधात रोष व्यक्त करत केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली गावात कुंडलिक खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले. यावेळी खांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर काल कुंडलिक खांडे यांचं कार्यालय फोडण्यात आले होते. आणि आता कुंडलिक खांडे यांच्या विरोधात हा रोष व्यक्त होताना दिसून येत आहे.
NEET Exam Mumbai : साकीनाका येथील नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक गायब
NEET Exam Mumbai : साकीनाका येथील वन एरोसिटी येथे नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्याने मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा. ली असं या कंपनीचं नाव आहे. तिच्या मालकाचं नाव अरविंद देशमुख असल्याचं त्यानं कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र, काल अचानक ही कंपनी बंद करून मालक फरार झाल्यानं मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीच्या मालकानं फरार झाल्यानं यात संशय निर्माण होत आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही.त्यात कोणतेही कारण न देता ही कंपनी बंद केल्याने कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत, तसेच चौकशी ची मागणी करीत आहेत.























