Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसामुळे हाल, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे पुणे, मुंबई यासारख्या प्रमुख शहरांसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जोरदार पाऊस पडत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
कोरेगाव पार्क बलात्कार प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक
पुणे
कोरेगाव पार्क बलात्कार प्रकरण
आमदार रवींद्र धंगेकर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होणार
धंगेकर देणार पोलिसांना निवेदन
या घटनेचा सखोल तपास व्हावा यासाठी पोलिसांना देणार निवेदन
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट पदीनियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक गट नाराज- सूत्र
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट पदी नियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक गट नाराज- सूत्र
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून मुंबई प्रदेशला विश्वासात न घेता नियुक्ती केल्यामुळे नाराजीचा सूर
मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांना विश्वासात न घेता तीन सदस्यांची नेमणूक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे जी नावे पाठवण्यात आली त्याबाबत मुंबई अध्यक्षांना कळवल नसल्याची सूत्रांची माहिती
मुंबई प्रदेश मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत- सूत्र























