Maharashtra Breaking LIVE 22nd August: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 22nd August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2024 03:23 PM
जाती-जातींमध्ये दरार निर्माण करणाऱ्या विकृतींना बळी पडू नका : उदयनराजे भोसले

अलीकडच्या काळातील काही विकृती पाहायला मिळते. समाजाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणातून व्यक्ती केंद्रित लोक स्वतःचे हित साधण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजांमध्ये दरार निर्माण करण्याचे काम करत आहेत. अशा गोष्टींना बळी पडू नका, असे आवाहन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. 

Igatpuri News : इगतपुरी घोटी येथील स्टेट बँकेसमोर महिलांची मोठी गर्दी

Igatpuri News : महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी महिलांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. घोटी येथील स्टेट बँकेच्या परिसरात रात्री आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आणि अन्य तांत्रिक कामं करता महिलांची बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र बँकेत येणाऱ्या महिलांनी रात्री चक्क बँकेचे बाहेर मुक्काम केला स्टेट बँक प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप देखील महिला करत होत्या त्यामुळे प्रशासन आणि महिलांमध्ये काही काळ वाद देखील झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र सध्या घोटी परिसरातील स्टेट बँकेची परिसरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Sangali News : 25 ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठाननं जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतला

Sangali News : 25 ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठानने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतला


25 ऑगस्ट रोजी श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हा बंदचा दिला होता इशारा


पण बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या बाबतच्या मागणीवर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे निर्णय घेतला जाईल


24 ऑगस्टला मविआ कडून पुकारण्यात आलेला बंद आणि 25 ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने  24 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेण्याचा घेतला निर्णय

Eknath Khadse : एकनाथ खडसे नेमके कुणाचे? राष्ट्रवादीचे की भाजपचे?

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या मौनात दडलंय काय, खडसे अजूनही राष्ट्रवादीचे की भाजपचे असा सवाल उपस्थित झालाय. खडसेंनी लोकसभा निवडणुकीच्याआधी भाजप प्रवेशाचं सूतोवाच केलं. भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. एवढंच नाही तर एबीपी माझाच्या प्रतिनिधीला भाजप प्रवेश करत असल्याचं फोनवरून सांगितलंही. मात्र अजूनही खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते अजूनही पूर्णपणे भाजपवासी झालेले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित होतोय. 25 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आहेत या कार्यक्रमात खडसें जाणार का याकडेही राज्याच लक्ष लागले आहे

Pune News : पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी

Pune News : पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य शिवाजी सौदागर (वय 23) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर बुधवारी सायंकाळी थांबला होता. त्या वेळी अचानक झाडाची फांदी त्याच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sindhudurg: गणेश उत्सवाच्या काळात खासगी बसेस कडून चाकरमान्यांची लूट केल्यास कारवाईचे संकेत


Sindhudurg: गणेश उत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची खाजगी बस वाल्यांकडून लूट होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सज्ज झालं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेले दरापेक्षा जास्त दराने खाजगी बस तिकीट आकारत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळा बसेस च्या दीड पट खाजगी बसेस ने दर आकारले पाहिजेत. यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई केली जाईल. त्यासाठी येणाऱ्या काळात बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि खाजगी बस बुकिंग सेंटर ला दर पत्रक प्रसिद्ध केले जाणार आहेत. तसेच एक टीम त्यासाठी नेमण्यात येणार आहे.


Kolhapur News : महायुती आणि आपला संबंध संपला, महायुतीच्या मेळाव्याला जाण्याचा प्रश्नच नाही, समरजीत घाटगेंनी स्पष्ट केली भूमिका

Kolhapur News : हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीचा आणि आपला संबंधच संपल्याचा संदेशच दिलाय असं समरजित घाटगेंनी म्हटल्याची माहिती आहे. भाजप शिष्टमंडळासमोर त्यांनी ही बाजू मांडली. त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले. आता आपण खूप पुढे निघून गेलोय, मागे येणं शक्य नाही असंही ते म्हणाले. काल समरजित घाटगेंच्या भेटीसाठी आलेल्या भाजप शिष्टमंडळासमोर त्यांनी या भावना मांडल्याचं समजतंय.

Mumbai News : गणेशोत्सवात वाहतूक पोलिसांकडून मुंबईत 'ग्रीन काॅरीडोर' रस्त्याची संकल्पना

Navi Mumbai News : नवी मुंबईतून गणेशोत्सवात पश्चिम उपनगरात जायचे म्हटले, तर वाहतूक कोंडींचा सामना करत नागरिकांना 2 तासाचा प्रवास करावा लागतो. मग तुम्ही ठाणे मार्गे जावा किंवा वाशी खाडीपूल मार्गे. वाहतूकीचा कालावधी 2 तासाहून अधिक लागतो. तर ठाण्यातून पूर्वद्रूतगती मार्गे मुंबईत यायचे झाल्यास 1 तास 20 मिनिटांचा कालावधी लागतो. हीबाब लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होऊ नये य अनुशंगाने वाहतूक पोलिसांकडून मुंबईत  एक 'ग्रीन काॅरीडोर' रस्त्याची संकल्पना राबवली जाणार आहे. यात नवी मुंबईतील व्यकती अवघ्या 50 मिनिटात नवी मुंबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाटू शकणार आहे. तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता. दक्षिण मुंबईत पूर्व द्रूतगती मार्गावरून येणारी वाहतूक ही लालबाग उड्डाणपुलाखालून भारतमाता सिग्नलहून करीरोडच्या दिशेने वळवत पुढे ना.म.जोशी मार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

Maharashtra Rains : राज्यातील विविध भागांमध्ये चांगला पाऊस बरसतोय, दुसरीकडे मराठवाड्यात मात्र, समाधानकारक पाऊस नाही

Maharashtra Rains : राज्यातील विविध भागांमध्ये चांगला पाऊस बरसत असताना मराठवाड्यामध्ये अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्प अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या दुष्काळी परिस्थितीत दिलासा देणारी बातमी परभणीतून. परभणीच्या जिंतुरमधील निवळी प्रकल्प हा 100 टक्के भरला आहे. या परिसरातील 35 पेक्षा जास्त गाव आणि 1500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांची चिंता मिटलीय. 

Mumbai Local Updates : बदलापूर प्रकरणी आज मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटना आंदोलन करणार

Mumbai Local Updates : मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येतंय.. सततच्या उशिरा लोकल, एक्सप्रेस गाड्यांना दिले जाणारे प्राधान्य, रखडलेले रेल्वे प्रकल्प या विरोधात हे आंदोलन करण्यात येतंय. .  ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण अश्या स्थानकात हे आंदोलन करण्यात येतंय. 

Nagpur News: हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावं एकापेक्षा अधिक मतदार संघात असल्याची तक्रार

Nagpur News: हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावं एकापेक्षा अधिक मतदार संघाच असल्य़ाची तक्रार मविआकडून करण्यात आलीय.  हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार केलीय. दरम्यान,  आमदार समीर मेघे यांनी आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे नाव रहिवासी नसतांना हिंगणा विधानसभेत नोंदवून घेतल्याचा आरोप मविआकडून करण्यात आलाय.   दरम्यान  आमदार समीर मेघे यांनी हे आरोप फेटाळलेत.. 

Sangali Vidhan Sabha Election : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच

Sangali Vidhan Sabha Election : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झालीय. महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे  मिरजमधून ठाकरेंच्या शिवसेनेमधून प्रा. सिदार्थ जाधव यांनी उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचा दावा केलाय. 


 

Buldhana News : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसून शेतकरी आत्महत्या कशा करतात याचं प्रात्यक्षिक दाखवणार, रविकांत तुपकरांचा इशारा

Buldhana News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी घुसून शेतकरी आत्महत्या कशा करतात याचं प्रात्यक्षिक दाखवणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस दिलीय.दरम्यान  रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे. उद्या मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कशा करतात य़ाचं प्रत्य़क्षित दाखवणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने मुंबईच्या दिशेनं निघाले असून तुपकर वेगळ्या मार्गाने मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे.

Nagpur News: आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्र पक्षासाठी सोडणार नाही; नागपुरातील जागांवर दावा करणाऱ्या ठाकरे गटाला काँग्रेसनं ठणकावलं

Nagpur News: नागपूर दौऱ्यावर असताना  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपूर शहरातील पूर्व नागपूर या विधानसभा जागेवर आपल्या पक्षाचा  दावा केला होता त्यावर आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्र पक्षासाठी सोडणार नाही असं काँग्रेसने ठणकावून सांगितलंय. 2019 दक्षिण नागपूर मध्ये काँग्रेसचा उमेदवार फक्त 4 हजार मतांनी पराभूत झाला त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचं मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरेंनी मांडलं

Badlapur HC Hearing : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, आज तातडीची सुनावणी

Badlapur HC Hearing : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलीये. या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आज सकाळी तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीकडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी होणार आहे. 

Sharad Pawar on MPSC Aandolan : एमपीएससी आंदोलकांसाठी शरद पवारही मैदानात, सरकारला आजचा अल्टिमेटम

Sharad Pawar on MPSC Aandolan : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं शरद पवारांनी ट्विटद्वारे म्हटलंय 

MPSC Exams : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी; संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन

MPSC Exams : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झालीये त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली. दरम्यान यासंदर्भात थोड्याच वेळात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा उमेदवारांना आहे.  एमपीएससी कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे ही बैठक होणार आहे दरम्यान काल  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. तर रात्रभर रोहित पवार आंदोलकांसोबत आहेत..आता शरद पवार यांनी देखील ट्विट करत लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केलंय.

Miraj Vidhan Sabha Election : मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट भाजपच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार

Miraj Vidhan Sabha Election : मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.   मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांना पराभूत करून या मतदारसंघातुन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मिरज मधून शिवसेनेचे नेते प्रा.सिदार्थ जाधव यांनी आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचा दावा केलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 22nd August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...


1. बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी


2. नराधम अक्षय शिंदेच्या आई-वडिलांशी एबीपी माझाची चर्चा, म्हणाले, अक्षय निर्दोष, त्याला फसवलं जातंय, स्थानिकांकडून कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप


3. बदलापुरात 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत,  व्यवहार हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त कायम


4. बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग, शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उपायोजनेचा जीआर जारी, शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रुम तयार करण्याचे आदेश, 7 जणांची समिती गठित


5. आयबीपीएस आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्याच्या मुद्यावर आज एमपीएसची बैठक, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग्य निर्णय घ्या असा शरद पवारांचा इशारा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.