Maharashtra Breaking 20th June LIVE Updates: जुना पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तासानंतर वाहतूक खुली
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ. कपाशीच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ. धानाच्या एमएसपीत ११७ रुपयांची वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
Nanded News: नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक, ओबीसी बांधव रस्त्यावर, नांदेड लातूर महामार्ग रोखला
Nanded News: प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळतोय.नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत.प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेड लातूर हा महामार्ग या ओबीसी बांधवांनी रोखून धरला आहे.नांदेडच्या माळाकोळी या गावाजवळ हे हे आंदोलन सुरू आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी या ओबीसी बांधवांनी केलीय.
Sindhudurg News: सिंधुदुर्गात 45 टक्के पेरण्या पूर्ण, संरक्षित पाण्याचा वापर करून भाताच्या रोपांना पाणी द्यावं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आव्हाहन
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्हात खरीप हंगामात भात आणि नाचणी ही पीक घेतली जातात. मात्र सध्या कोकणात म्हणावा तसा पाऊस पडलेला नसल्याने भात पेरणी केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हयात 63 हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यासाठी लागणारी भाताची रोपांची 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जून महिन्यात सरासरी 63 टक्के सिंधुदुर्गात पाऊस झालेला आहे. ज्या शेतकर्यांनी भाताची रोप टाकली आहेत त्यांनी संरक्षित पाण्याचा वापर करून रोप वाचवावी. आजपासून सिंधुदुर्गात अधिक चांगल्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी चांगला पाऊस पडला आहे. सिंधुदुर्गात पडलेला पाऊस पाहता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र याबाबत नेते अनभीज्ञ आहेत.























