(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking LIVE : हार्बर रेल्वेचा खोळंबा, विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल रखडल्या
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking 2 September LIVE: सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले आहे. या तसेच राज्य, देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी, उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे या मागणीसाठी उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा, या समितीत अनेक एसटी कर्मचारी संघटनांचा समावेश
आंदोलन तीव्र झाल्यास ऐन सणासुदीत कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने लालपरीची चाकं उद्यापासून थांबवण्याची शक्यता
कृती समितीतील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ७ आॅगस्ट रोजी बैठक झाली होती
यात विविध मागण्यांवर चर्चा झाली होती, अशात अद्यापही तोडगा निघत नसल्याने संपाचा इशारा
वनराज आंदेकर खून प्रकरणी मोठी अपडेट, आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी केली अटक
पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी मोठी अपडेट
वनराज आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी केली अटक
वनराजचा खून करण्यासाठी त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्यानी बनवला होता प्लॅन
कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती
गेल्या अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते
काल जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराज चां काटा काढायचं ठरवलं
संध्याकाळी ८.३० वाजता नाना पेठेत वनराज वर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला
महाराष्ट्रामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, निलेश राणे यांचा मोठा दावा
भाजप नेते निलेश राणेंचा धक्कादायक दावा
महाराष्ट्रामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय - राणे
मुसळधार पावसानंतर माजलगाव पोलीस ठाण्याला लागली गळती
मुसळधार पावसानंतर माजलगाव पोलीस ठाण्याला लागली गळती..
बीडच्या माजलगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक यांच्या केबिन समोर व ठाणे अंमलदार यांच्या कक्षामध्ये कॉम्प्युटर विभागात पाणी गळती सुरू आहे..
बीडच्या माजलगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक यांच्या केबिन समोर व ठाणे अंमलदार यांच्या कक्षामध्ये कॉम्प्युटर विभागात पाणी गळती सुरू आहे..यामुळे कार्यालयीन काम करताना पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे..
हार्बर रेल्वेचा खोळंबा, विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल रखडल्या
हार्बर रेल्वेचा खोळंबा,
बेलापूर ते पनवेल जाणाऱ्या लोकल रखडल्या
विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल रखडल्या
पनवेल कडे जाणाऱ्या 3 लोकल थांबून
सी एस एम टी ते नेरूळ मार्ग सुरू