Maharashtra Breaking 17th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Shirdi News : शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह, साईभक्तांसाठी तब्बल 15 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद
Shirdi News : सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साई प्रसादालयात भाविकांसाठी खास 15 टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय. खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी 7 हजार किलो साबुदाणा , 5 हजार किलो शेंगदाणे , 3 हजार किलो बटाटे , 1.5 हजार किलो तूप , मिरची असे साहित्य वापरून महाखिचडी प्रसाद बनविण्यात आला आहे.
CM Eknath Shinde : मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार, गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार करणार : मुख्यमंत्री
CM Eknath Shinde : मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काळजी करु नका याबाबत लवकरच बातमी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार होईल असेही ते म्हणाले.
बनावटीचे मद्य वाहतूक करताना दोन जणांना अटक, वाणगाव पोलिसांनी केली कारवाई
Palghar News : महाराष्ट्रात विक्रीसाठी वाहतुकीस बंदी असलेलं दादरा नगर हवेली आणि दमन बनावटीचे मद्य वाहतूक करताना पालघरमधील वाणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे . मिळालेल्या गुप्त माहितीवरून वानगाव पोलिसांनी चिंचणी येथे ही कारवाई केली असून या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे . या कारवाईत एका चार चाकी वाहनासह एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अवैधरीत्या मद्य वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे .
Amboli Ghat : अंबोली घाटात रस्त्याच्या मधोमध कोसळला भला मोठा दगड, वाहतूक बंद
Amboli Ghat News : सिंधुदुर्गमधील आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुक नसल्याने अनर्थ टळला. मात्र सध्या आंबोली घाटात वाहतुक बंद करण्यात आली असून हा दगड दरडी कोसळण्याच्या ठिकाणी पडला आहे. सध्या हा दगड हटवण्याचे काम करू असून दगड हटवल्या नंतर आंबोली घाटातील वाहतूक सुरू केली जाणार आहे.
Ashadhi Ekadashi News : कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी साकारले विठ्ठलाचे स्टोन आर्ट
Ashadhi Ekadashi News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे स्टोन आर्ट साकारले आहे. दगडावर विविध प्रकारच्या रंगांची उधळण करून सुमन दाभोलकर यांनी विठ्ठलाचे आकर्षक असं स्टोन आर्ट साकरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
