Maharashtra News Live Update : विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार

Maharashtra Breaking 19th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

प्रज्वल ढगे Last Updated: 19 Jul 2024 04:22 PM
विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार

विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार 


 सपाचे महाराष्ट्रातले नेते लवकरच विशालगडावर जाणार 


 देशात अनेक प्रश्न असताना फक्त धार्मिक राजकारण सुरू आहे 


 देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही बोलणार 


 लोकांना धार्मिक राजकारण नको म्हणून त्यांनी अयोध्येत भाजपला नाकारलं 


 हीच परिस्थिती महाराष्ट्र आणि देशभर 


 सपाच्या खासदारांची भावना  

फुटलेल्या आमदारांवर होणार निलंबनाची कारवाई? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवरती होणार कठोर कारवाई


सातही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता


या सातही आमदारांवरती काय कारवाई केली याची माहिती येत्या दोन दिवसांमध्ये येणार पुढे


चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीत मत फुटल्यानंतर या निवडणुकीत काँग्रेसने सावध भूमिका घेतली होती


या निवडणुकीत जे आमदार फुटलेले आहेत त्यांचे पुरावे काँग्रेसकडे असल्याची सूत्रांची माहिती


येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणुगोपाल या संदर्भात घोषणा करणार


पक्षाला शिस्त लावण्यासाठी काँग्रेसचे हाय कमांड करणार कठोर कारवाई

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित; काही रद्द, काही विलंबाने; बुकिंग आणि चेक-इन देखील होईना

Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी (19 जुलै) भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशीरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, "आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील केले आहे. आम्ही कारण निश्चित केले आहे. सविस्तर बातमीसाठी येथे क्लीक करा

जुन्नरमधील कल्याण नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात, ट्रक ने तीन दुचाकी स्वरांना चिरडले

पुणे, जुन्नर : कल्याण नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात....


भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने तीन दुचाकीस्वरांना चिरडले


त्याचवेळी अंत्यविधी वरून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांनाही चिरडलं....


अपघातात काही जण दगावल्याची भीती व्यक्त केली जातीये


तर अपघातात अनेक जण जखमी...


जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल....


अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला


काही वेळापूर्वी हा अपघात झाला आहे.

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू, 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा सूर

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू 


काँग्रेस पक्षाकडून 288 जागेवर उमेदवार आणि जनमत याची चाचपणी करत आहे


महाविकास आघाडीसोबत चर्चेआधीच 288 मतदारसंघाचा आढावा घेऊन काँग्रेस आपला कोठा निश्चित करणार


काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढाव्यात, असा अनेक नेत्यांचा सूर

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू, 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा सूर

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू 


काँग्रेस पक्षाकडून 288 जागेवर उमेदवार आणि जनमत याची चाचपणी करत आहे


महाविकास आघाडीसोबत चर्चेआधीच 288 मतदारसंघाचा आढावा घेऊन काँग्रेस आपला कोठा निश्चित करणार


काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढाव्यात, असा अनेक नेत्यांचा सूर

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू, 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा सूर

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू 


काँग्रेस पक्षाकडून 288 जागेवर उमेदवार आणि जनमत याची चाचपणी करत आहे


महाविकास आघाडीसोबत चर्चेआधीच 288 मतदारसंघाचा आढावा घेऊन काँग्रेस आपला कोठा निश्चित करणार


काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढाव्यात, असा अनेक नेत्यांचा सूर

भर पावसात बांधकामावर हातोडा चालवण्याची गरज काय? विशाळगड हिंसाचार प्रकरणी हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

विशाळगड हिंसाचार प्रकरण


भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल


आंदोलकांनी मशिदहीवर चढाई केल्याचा याचिकाकर्त्यांचा गंभीर आरोप

विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी

विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी


विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं.


कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामं पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची याचिकेत मागणी


विशाळगडावरील बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची याचिकेतून मागणी


या बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकेत उल्लेख


विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सध्या स्थानिक प्रशासनानं हाती घेतली आहे


तर काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून 'चलो विशाळगड' किंवा 'विशाळगड बचाव' मोहीम राबवली जात आहे


या मोहिमेला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप

धक्कादायक! बुलढाण्यात दहावीच्या वर्गाला सर्व विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक, विद्यार्थ्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

बुलढाणा : दहावीच्या वर्गाला सर्व विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक.


शिक्षक नसल्याने विद्यार्थी महामार्गाने चालत निघाले गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी.


शालेय विद्यार्थी पाच किमी चालत जळगाव जामोद येथे निघाले.


जळगाव जामोद तालुक्यातील असालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था.

मनोरमा खेडकर रायगडमधे बनावट आधारकार्ड दाखवून लॉजवर राहिल्या

मनोरमा खेडकर पिस्तुल दाखवून धमकावल्याचे प्रकरण


मनोरमा खेडकर रायगडमधे बनावट आधारकार्ड दाखवून लॉजवर राहिल्या


पुणे SP हे रायगड SP यांना मनोरमा खेडकर हिच्या बनावट आधार कार्ड प्रकरणाचा अहवाल पाठवणार

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, महागाईमुळे खर्च वाढला- जयंत पाटील

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी शेतीमालाला हमीभाव मिळत नाहीये. महागाईमुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे दिलेल्या हमीभावातून शेतकऱ्यांचा खर्च निघत नाहीये, असे जयंत पाटील म्हणाले.  

RTE Law : आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, राज्य सरकारला मोठा दणका!

आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, राज्य सरकारला मोठा दणका


शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य - हायकोर्ट


खासगी, विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळ्याबाबत 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला दिलेलंआव्हान हायकोर्टानं स्वीकारलं


मे महिन्यातच हायकोर्टानं दिली होती या अधिसूचनेला स्थगिती


मात्रा या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करु नयेत, हायकोर्टाचे निर्देश


शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायाचं हा अधिकार पालकांचा व‌ विद्यार्थ्याचा आहे. अचानक नवीन नियम करुन त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही, याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाला मान्य


आरटीईमुळे सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्या घटत चालल्याचा राज्य सरकारचा दावा

Beed Shirala Bandh : विशाळगड हिंसाचाराच्या निषेधार्थ बीडच्या शिरसाळ्यात आज बंद

विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज बीडच्या शिरसाळा येथे बंद पुकारण्यात आलेला आहे. यानिमित्त संपूर्ण बाजारपेठ सकाळपासूनच बंद असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तसेच दुपारी मुस्लीम बांधवांच्या वतीने रॅली काढण्यात येणार असून आज शिरसाळ्याची बाजारपेठ बंद असणार आहे. विशाळगडमध्ये अतिक्रमणावरून झालेल्या घटनेचे परिणाम राज्यभर होताना पाहायला मिळतात बीड जिल्ह्यातसुद्धा विशाळगडच्या घटने संदर्भात शिरसाळा शहर बंद ठेवण्यात आला आहे.

Congress Meeting Live : महाराष्ट्र काँग्रेसची महत्त्वाची बैठक, फुटीर 7 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता

काँग्रेसच प्रदेशच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आज विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगांने चर्चा होणार आणि रणनीती आखली जाणार


विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, आहे त्या 7 आमदारांवर आज कारवाई होण्याची शक्यता 


आजच्या बैठकीत फक्त विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांने बैठक होणार आहे आणि किती जागांचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीला देण्यात येणार यावर चर्चा होणार


क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती

Maharashtra News Update : पुणे पोलिसांची पूजा खेडकर यांना दुसऱ्यांदा नोटीस, जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं!

स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी 20 जुलैला उपस्थित रहावे यासाठी पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा पूजा खेडकर यांना नोटीस दिली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलावल्यानंतर आपल्याला लगेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी येणं शक्य नाही, असं उत्तर पूजा खेडकर यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून दुसरी नोटीस बजावण्यात आलीय. उद्या पुजा खेडकर त्यासाठी पुण्यात येणार का हे पहावं लागेल.

Maharashtra News Live Update : वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची संततधार, लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने

विरार : वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळपासून विरार ते चर्चगेट धावणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटाने उशिराने धावत आहेत. वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नाही.  हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. आभाळ पूर्णपणे भरलेले असून, दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दहा गुन्हेगार तडीपार

 नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलंय. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली असून दहशत वाजवून भाईगिरी करणाऱ्या दहा सराईत गुंडांना पोलिसांनी दणका दिलाय. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. आगामी सण उत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात शांतता राहावी यासाठी पोलिसांकडून ही पावले उचलण्यात आलीत.

Jitendra Awhad Vishalgad Visit : जितेंद्र आव्हाड आज विशाळगडाकडे येणार, गजापूर गावात घेणार भेट 

Maharashtra News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आज विशाळगडाकडे येणार


 विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात आव्हाड यांची भेट 


ज्या ठिकाणी तोडफोड झाली होती तिथल्या घरांना देणार भेट

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तुरळक ठिकाणी पाऊस

पालघर : जिल्ह्यात रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे

मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा 

मुंबई : मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी 


2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा 


सतत पडणार पाऊस ,सिंग्नल यंत्रणा ,खड्डे आणि टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी 


चाकरमान्यांचे हाल

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता आहे.  या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व घडामोडींचा आढावा वाचा एका क्लीकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.