Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतही विविध अपडेट्स येत आहेत. पाकिस्तानातून आका देत होते दहशतवाद्यांना सूचना, पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर 'माझा'च्या हाती लागली आहे. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी आणखी चार ठिकाणांची रेकी केली होती. तर महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती व्यवसायाला उद्योगक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला लागली भीषण आग
सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला लागली भीषण आग
सोलापूर-मंगळवेढा महामार्गवरील देगाव जवळील पेट्रोल पंपावरील घटना
स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप अस्पष्ट
मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
गाडीत डिझेल भरल्यानंतर चालकाला शंका येताच त्याने गाडी बाजूला लावली
त्यावेळी अचानक गाडीत लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतलं
दरम्यान अग्निशमन दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात अतोनात प्रयत्न केल्याने मोठी घटना टळली
सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश
सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश
जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्जप्रकरणे, जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या
ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे
मोहिमेअंतर्गत तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत























