मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने पक्ष संपवायचा ठरवलेय, चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका
Chandrakant Patil : मुख्यमंत्र्यांना खुर्ची मजबूत आहे का? हे सारखं तपासून पहावं लागतय. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला असला तरी शिवसेनेच्या लक्षात येत नाही
![मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने पक्ष संपवायचा ठरवलेय, चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका Maharashtra bjp state President Chandrakant Patil slam shiv sena in sangli मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने पक्ष संपवायचा ठरवलेय, चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/20/52452c898310a5d9d8419228b34749b1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrakant Patil : राज्यात भाजप पक्ष नंबर एकचा पक्ष बनला आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रिपदापायी आपला पक्षच संपवायचा ठरवलेय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची मजबूत आहे का? हे सारख तपासून पहावं लागतय. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला असला तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. पेठनाका येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार संग्रामसिह देशमुख, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख , भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक निशिकांत पाटील उपस्थित होते.
राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने 21 जागा जिंकल्यात. त्यामुळे भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागाच मिळाल्यात. मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने आपला पक्षच संपविला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो; हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची मजबूत आहे का? हे सारख तपासून पहाव लागत आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेना पक्ष संपवायचं ठरवल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला असला तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मिळून महा विकास आघाडीचे सरकार बनवलं खरं मात्र याच मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना पक्षच संपत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अजून लक्षात येत नाही, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. अटीतटीच्या झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळवत भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नेत्यांचा अभिनंदन केले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)