Bhandara Hospital Fire Live Updates | महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षपदी संध्या सवालाखे यांची नियुक्ती

Maharashtra Bhandara Hospital Fire Live Updates : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jan 2021 07:26 PM
महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्षपदी
,चारुलता टोकस यांच्या जागी
,संध्या सवालाखे यांची नियुक्ती
नागपूर : रामबाग परिसरात एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू,

20 वर्षाचा तरुण रस्त्यावरून एक्टिव्हाने जात असताना रस्त्यावर नायलॉन मांजा आडवा आला,

अभिषेक शेंडे असे तरुणाचे नाव,

चालत्या गाडीवर गळा चिरून जाऊन जागेवरच मृत्यू झाला आहे
उद्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी येणार भंडारा सामान्य रुग्णालयात. घडलेल्या घटनेचा स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन आढावा घेणार
कामगार नेते मा. श्री. सुर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने झेन हॉस्पिटल मध्ये रात्री साडे आठ वाजता निधन झाले. चेंबूर येथे सकाळी सात ते दहा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. अंतिमसंस्कार त्यांच्या मूळगावी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, हे दुःख न भरून निघणारे आहे, मी सांत्वन करायला आलो आहे. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती बनविली आहे, यात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख ही असणार आहे. या समितीत सहा सदस्य राहतील, महिन्याभरात त्याचा अहवाल येईल, त्यानंतर आम्ही आवश्यक कारवाई करु, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगदळे यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा जिल्ह्यात पोहचले. भौजापूर गावाकडे रवाना झाले असून तिथे बेहेरे कुटुंबियाची भेट घेणार आहेत.
भंडारा जिल्हा सामान्य रुगणालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थोड्याच वेळात येणार असल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी लावून स्वछता करण्यात येत आहे. अशीच धावपळ जर रुग्णालय प्रशासनाने दोन दिवसांआधी झालेल्या दुर्घटनेआधी दाखवीली असती तर 10 निश्पाप नवजात मुलांना आपला जीव गमवावा लागला नसता अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सहा महिन्यांआधीच रुग्णालयात फायर उपकरणं नसल्यानं फायर उपकरणं बसविण्यात यावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोग्य विभाकडे प्रसताव पाठवला होता. मात्र आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने बघितलं असतं तर आज ही घटना घडाली नसती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.
'भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात ज्या ठिकाणी आग लागली तिथे फायर अलार्म नव्हता. जर फायर अलार्म राहिला असता तर धूर झाल्यानंतर फायर अलार्म वाजला असता आणि कर्मचारी सावध होऊन मदत कार्य लवकर होऊ शकले असते.. शिवाय ज्या ठिकाणी आग लागली तिथे पाण्याची पाईपलाईनही नव्हती, त्यामुळे बाथरूममधून बादल्यांमधून पाणी आणून आग विझवणे कठीण कार्य होते', राजकुमार दहेकर नावाचे जे एम्ब्युलेन्स चालक बचाव कार्यासाठी सर्वात आधी पोहोचणाऱ्यांपैकी एक होते, त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

7 मुलांना वाचवण्यात यश आले, जर अलार्म आणि इतर सोय राहिल्या असत्या तर दगावलेल्या 10 मुलांना वाचवणे ही शक्य झाले असते असे मत राजकुमार यांनी व्यक्त केले आहे..
भंडाऱ्यातील दुर्घटनात अतिशय दुर्दैवी असून दुःख भरुन निघणारं नाही. या संदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे राज्याचे वनमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे .
भंडारा येथे अतिशय वाईट घटना घडली. कोणाचा हलगर्जीपणा होता याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू पुढे म्हणाले की, आज मी त्याठिकाणी भेट देणार असून यापुढे अशी घटना राज्यात घडू नये याची काळजी घेतली जाईल. शब्दांनी दुःख सहन होत नाही तरी जितकं बळ राज्य सरकारकडून द्यायचं आहे ते देण्याचं प्रयत्न करु.
आगीची घटना घडली त्या शिशु केअर युनिटमच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून समस्या होती. वीजपुरवठा कमी जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही. मे 2020 पासून तर तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा असे पत्र दिले होते, मात्र, तरीही ऑडिट केलं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

ही हत्या, महाराष्ट्र सरकार जबाबदार : राम कदम


भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांकडून दु:ख व्यक्त


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख आज दुपारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देणार


भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी भेट देणार आहेत.

सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा : अजित पवार यांचे निर्देश



भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भंडाऱ्यातील दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. "भंडाऱ्यातील दुर्घटना हृदय पिळवटणारी आहे. आपण मौल्यवान जीव गमावले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो," असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील टोपे म्हणाले.

पार्श्वभूमी

भंडारा : महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.


 


जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.


 


या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.


 


दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.


 


भंडारा जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.