Sindhudurg News : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांना पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोकणात देखील मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. दरम्यान, कुडाळ बाजारपेठेत पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना घडली आहे. इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरुन वादावादी झाली आहे. कुडाळमधील व्यावसायिक आप्पा गडेकर याला इनोवा कारमधील मुंबईमधील महिला पर्यटकांनी हुज्जत घालत बेदम मारहाण केली आहे. पर्यटकांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.


राजकीय पदाचा वापर करुन पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या संशयावरून कविलकाटे गावातील नागरिक कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आहे. याप्रकरणी पोलिस परस्पर विरोधी तक्रारी घेऊन मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, स्थानिकांना मारहाण का केली? त्या पर्यटकांना आम्हाला सुपुर्द करा अशी मागणी पोलिसांकडे करत आहेत.


नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकर आणि पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. 2024 च्या अखेरच्या सुर्यास्ताला आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. सोबतच, पोलिसांचा मोठा बंदोबस्त ह्या संपूर्ण परिसरात आहे. रात्री मुंबईकरांकडून जंगी सेलिब्रेशन ह्या मरीन ड्राईव्ह परिसरात होताना दिसणार आहे. 2024 वर्ष सरला आणि उद्या 2025 चा सूर्योदय होणार आहे, आज 31 डिसेंबर 2024 म्हणजेच या वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाच्या जायकवाडीवरील सुर्यास्ताच  विहंगम दृश्य  पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. दरम्यान, राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात जल्लोषाथ नवीन वर्षाच स्वागत केलं जात आहे.


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर मध्ये देखील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर मध्ये देखील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे . पालघरच्या केळवा , चिंचणी , डहाणू , बोर्डी या समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते . मुंबई ठाणे या महानगरांतलगत असल्याने येथील पर्यटक मोठ्या प्रमाणावर सध्या पालघर मध्ये देखील गर्दी करत आहेत. आज संध्याकाळच्या सुमारास पालघर मधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली 


महत्वाच्या बातम्या:


नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार, जानेवारीत कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज