IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसनं 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओचा किंमतपट्टा 785 रुपये होता. आयपीओ लिस्ट होताना 1460 रुपयांना लिस्ट झाला. म्हणजेच गुंतवणूकारांना प्रत्येक शेअर मागं 675 रुपयांचा फायदा झाला. 2024 मधील लिस्ट होणारा शेवटचा मेनबोर्ड आयपीओ होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी आज खुला झाला आहे. कंपनीनं आयपीओ 260.15 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला आहे.
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी आज खुला झाला आहे. कंपनीनं आयपीओ 260.15 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी 184 कोटी 90 लाख रुपयांचे 86 लाख नवे शेअर जारी करणार आहे. तर, 75.25 कोटी रुपयांचे 35 लाख शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 2 जानेवारीपर्यंत खुला राहील. 3 जानेवारीला शेअर अलॉट होतील 6 जानेवारीला ज्यांना आयपीओ लागला नाही त्यांना त्यांची रक्कम परत केली जाईल. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ 7 जानेवारीला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
कंपनीनं आयीओचा किंमत पट्टा 204-215 रुपयांदरम्यान ठेवला आहे. एका लॉटमध्ये 69 शेअर आहेत. या आयपीओच्या एका लॉटसाठी बोली लावायची असल्यास रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14835 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. रिटेल गुंतवणूकदार एकावेळी 13 लॉट खरेदी करु शकतात.
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ पहिल्याच दिवशी 17.93 पट सबस्क्राइब झाला आहे. यामध्ये क्यूआयबीकडून 8.1 पट, एनआयआयकडून 28.73 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांकडून 18.93 पट सबस्क्राइब झालाआहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)