New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असू द्या.. नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया.. येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
भिजलेली आसवे झेलून घे सुख-दुःख झोळीत साठवून घे आता उधळ हे सारे आकाशी नववर्षाचा आनंद भरभरून घे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबासाठी 2025 हे वर्ष खास असो संपूर्ण घर आनंदाने नांदत राहो तुमच्या प्रगतीसाठी नवी दारं उघडो आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वी ठरो. नववर्षाभिनंदन!
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी..! नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
इडा, पिडा टळू दे आणि नवीन वर्षात माझ्या मित्रांना काय हवं ते मिळू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे वर्ष सर्वांना सुखाचे-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलेली वर्षे विसराया नवीन वर्षाचा स्वीकार करा माथा टेकून देवाला प्रार्थना करूया… या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!