एक्स्प्लोर

24 जानेवारीला सीएएविरोधात राज्यव्यापी बंद, 35 संघटनांचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरी कडे नेत आहे. अशा परिस्थितीत विरोधक सरकारला विरोध करत नाही. त्यामुळेच 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या संघटनांसह बंद पुकारणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे . तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत सर्व सामाजिक आर्थिक माहिती समोर येते मग एनपीआरची वेगळी गरज काय आहे? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटना अनेक वर्षांपासून त्यांच्या जातीनिहाय गणनेची मागणी करत आहेत. त्यांची ती मागणी मान्य न करता, नॅशनल पॉप्युलेशन सेन्सस केली जात आहे. कोणतेही परिवर्तन टप्प्या टप्प्याने घडवायचे असते. मात्र मोदी सरकारने जीएसटी सारखे निर्णय एका झटक्यात केले. त्यामुळे ते अधिकारी, व्यापारी कोणालाच कळले नाही. नोटबंदी करून काळ्या पैशावर चालणारे अनेक व्यवसाय - रोजगार बंद झाले. त्याचे विपरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाले आहे. देशात आवश्यक खर्च करण्यासाठी किमान 14 लाख कोटी लागतात. सध्या सरकारकडे फक्त 11 लाख कोटी जमा झाले आहे. 1 फेब्रुवारी ला केंद्रीय अर्थसंकल्प येणार आहे. तोपर्यंत 3 लाख कोटींची ही तूट भरून निघेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरी कडे नेत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला. देशात अशी परिस्थिती असताना विरोधक सरकारला हवं तसा तीव्र विरोध करत नाही. त्यामुळेच 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या संघटनांसह बंद पुकारणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. Prakash Ambedkar | इंदूमिलमधील स्मारकाच्या उंचीसाठी निधी देण्यापेक्षा वाडिया रुग्णालयासाठी द्या : प्रकाश आंबेडकर | ABP Majha आंबेडकर म्हणाले, 24 तारखेचा बंद शांतपणे पार पडेल. आम्ही लोकांसमोर सर्व स्थिती मांडली आहे. आता लोकांनी त्यांचं स्वतः ठरवून बंदला पाठिंबा द्यावा असे आम्हाला वाटते. आम्ही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करणार नाही. देशात सध्या सीएए आणि एनआरसीबद्दल जे आंदोलन सुरू आहे. ते विविध विद्यार्थी संघटनाआणि एनजीओ यांनी उभारले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रमुख पक्षांनी स्वतःच्या बळावर आंदोलन करावे. दुसऱ्याच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन फायदे घेऊ नये. बाबासाहेब म्हणायचे पुतळे निर्जीव असून माणूस जिवंत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारकावर पैसे खर्च करण्याऐवजी ते पैसे वाडिया सारख्या रुग्णालयांना द्यावे. माझ्या या वक्तव्यावर जर कोणी टीका करणार असेल तर करावी मी टीकेला घाबरत नाही, असे आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget