Maharashtra Bandh Live : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
Maharashtra Bandh Today Live : महाराष्ट्र बंदची प्रत्येक घडामोड, अपडेट्स वाचा एका क्लिकवर
बारामती : आज महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील भिगवण चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळया फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी आंदोलकांनी तोंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध केला
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
भर पावसात आंदोलनाला सुरुवात झाली
नागपूर -
- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने काढली बाईक रॅली
- काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात नागपुरात शहरात कढण्यात आली बाईक-स्कुटर रॅली
- बदलापूर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी
- सोबतच घटनेसाठी जबाबदार असलेल्या इतरांवरही कारवाई करण्याची रॅलीच्या माध्यमातून मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन केले जाणार
पाऊस सुरू असल्याने भर पावसात होणार आंदोलन
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ होणार आंदोलन
बदलापूर घटनेचा निषेध म्हणून थोड्याच वेळात ठाण्यातील तलावपाली परिसारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण आणि इतर राजकीय नेते मूक आंदोलन करतील.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सध्या पुण्यात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन चालू आहे. या आंदोलनात शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त सहभागी झाले आहेत. सध्या आंदोलनस्थळी पाऊस चालू आहे. पण पावसाला न जुमानता शरद पावर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दुसरीकडे भर पावसात सुप्रिया सुळेदेखील आंदोलनस्थळी बसलेल्या आहेत.
बदलापूर येथे अत्याचाराचे प्रकरण घडलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती मात्र शुक्रवारी कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला आणि त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेत ठीक ठिकाणी राज्यभरात आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर काही वेळातच पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या आंदोलन स्थळी एकही कार्यकर्ता उपस्थित नाही मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. हा परिसर सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या वतीने अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले असून आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीने होईल.
पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन होत आहे. आंदोलनाच्या स्थळी शरद पावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
पुण्यात आज शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार मूक आंदोलन
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे.
मात्र,महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मूक आंदोलन केले जाणार आहे.
आज सकाळी 10 ते 11 या वेळेत शरद पवार यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन केले जाणार आहे.
पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन होईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी आजचा महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते.
बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये 10 वर्षाच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस
- नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग
- खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांनेच केला विनयभंग
- उपेंद्र नगरमधील धक्कादायक प्रकार
मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मविआच्या सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयाचा, संविधानाचा आदर करून बंद मागे घ्या, असे आवाहन केले.
- महाविकास आघाडीच्या आंदोलनांना भाजप देणार प्रत्युत्तर
- राज्यातील प्रमुख ठिकाणी भाजप नेते करणार मविआच्या भूमिकेचा निषेध
- मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी होणार धरणे आंदोलन
- विरोधकांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत असल्याची भाजपची प्रतिक्रिया
- मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चित्रा वाघ, आमदार प्रसाद लाड मुंबईत तर आमदार प्रविण दरेकर महाडच्या चवदार तळ्यावर करणार मविआचा निषेध
मुंबई : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जाणारआहे. मुंबईच्या शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणारआहेत. या पार्श्वभूमिवर शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीने आजचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. राज्यभरात महाविकास आघाडीचे नेते ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत.
पार्श्वभूमी
मुंबई : बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना (Badlapur Minor Abuse) समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -