Eknath Shinde : महायुतीची नवीन इनिंग सुरु झाली आहे. प्लेयर तेच आहेत. मॅच मात्र नवीन आहे असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. गेल्या अडीच वर्ष आम्ही टीम म्हणून काम केले. तेव्हा सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव कामी आला. नंतर अजितदादा आले आणि आम्ही टीम म्हणून काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. विदर्भात अधिवेशन होत आहे, विदर्भाला न्याय देण्यासाठी अडीच वर्षांत खूप काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 


आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. गेले काही दिवस तुम्हीच मंत्रीपद वाटप करत होतात. आम्ही पाहत होतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खाते वाटप ही लवकर होईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. सर्वात कमी वयाचे असताना 27 व्या वर्षी महापौर झाले. 44 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले.आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पुन्हा येईल त्यांच्या या वक्ततव्य वरुन अनेकांनी टिंगल उडवली. मात्र ते परत आलेच असेही एकनाथ शिंदे म्हणाले. फडणवीसांच्या पाठिशी खंबीरपणाने उभे राहणार असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


विरोधकांना कमी लेखणार नाही


विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी आम्हाला अडीच वर्षांमध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप केले. त्यांनी आम्हाला हलक्यात घेतले म्हणून त्यांची ही गत झाली. आम्ही त्यांना हल्क्यात घेणार नाही आणि त्यांचा मानसन्मान ठेवू. त्यांनी आता सकारात्मक राजकारण करावे असे एकनाथ शिंदे म्हणाले.


आज नागपूरमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यावेळी 39 जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यानंतर लगेच महायुतीची पत्रकार परिषद संपन्न झाली. यामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते. 



मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे


1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे 
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25 . संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरतशेठ गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबीटकर


राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी


34. माधुरी मिसाळ
35. आशिष जैयस्वाल
36. पंकज भोयर
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम