एक्स्प्लोर

लातुरमध्ये अवैध STD सेंटरचा पर्दाफाश, पाकला लष्कराची माहिती पुरवल्याचा संशय

 लातूर/मुंबई: जम्मू-काश्मीरच्या सीमेवर घुसखोरी सुरु असताना, आता दहशतवाद आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं चित्र आहे. कारण लातूरसारख्या छोट्याशा जिल्ह्यातील एका गावातून, एका अवैध STD सेंटरचं जाळं उद्ध्वस्त करुन, दोघांना अटक करण्यात आली आहे. या कॉलसेंटरवरुन सीमेपल्याड शत्रू राष्ट्रात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करुन, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधून लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने काल लातूर पोलिसांच्या मदतीने ही छापेमारी केली. आंतरराष्ट्रीय कॉल अवैध गेटवेच्या माध्यमातून, लोकल लाईनवर वळवून, माहितीची देवाण-घेवाण लातूरमधून चालत होती. अशापद्धतीचं तंत्र गुप्तचर यंत्रणेकडून शेजारी देशांशी संपर्क, माहिती काढण्यासाठी केला जातो. मात्र हे लातूरमध्ये सुरु असल्याने लष्करही अवाक् झालं होतं. त्यावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक कऱण्यात आलं आहे. 96 सिम कार्ड्स, 1 कॉम्प्युटर जप्त मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या प्रकाशनगरमधून इंटरनेट कॉल करुन पाकिस्तानात संपर्क साधला जात असल्याची माहिती, भारतीय लष्कराला मिळाली होती. धक्कादायक म्हणजे लातूरमधील एका छोट्याशा गावातून तांत्रिक तडजोडी करुन हे कॉल केले जात होते. लष्कराने दिलेल्या माहितीवरुन एटीएसने लातूरमधील प्रकाशनगरातील एका 33 वर्षीय व्यक्तीच्या घरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना 96 सिमकार्ड्स, 1 कॉम्प्युटर, 3 अवैध कॉल ट्रान्सफर मशिन्स सापडले. एटीएसने केलेल्या या छापेमारीत सुमारे 1 कोटी 90 लाखांची साहित्य जप्त केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती जे काही कॉलसेंटर सदृश्य सेंटर चालवत होता, ते सर्व बोगस आणि अवैध होतं. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. प्राथमिकदृष्ट्या एटीएसने या कॉलसेंटरमुळे सुमारे 15 कोटीचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवला आहे.  लातूरपासून 70 किमीवर दुसरी छापेमारी  पहिल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर, एटीएसने लातूरपासून 70 किमी अंतरावरील देवणी तालुक्यातील वलांडी गावात छापेमारी केली. या छाप्यात एटीएसने 2 आंतरराष्ट्रीय गेटवे, 14 सिमकार्ड्स आणि अन्य संशयास्पद साहित्य,असं 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चाकूरमध्ये छापेमारी यानंतर मग चाकूर तालुक्यातील जानवळमध्ये 27 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ही व्यक्ती भाड्याच्या घरात अवैध कॉलसेंटर चालवत असल्याचं उघड झालं. या आरोपीकडून 64 सिमकार्ड, 1 लॅपटॉप आणि 2 आंतरराष्ट्रीय गेटवे मशिन्स असा ऐवज जप्त करण्यात आला. या छापेमारीमुळे लातूर  आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लातूरसारख्या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अशापद्धतीचे नेटवर्क खरंच उभं राहिलं असेल, तर ही गंभीर बाब आहे. त्यातच पाकिस्तानला जर लष्कराची काही माहिती पुरवली गेली असेल, तर त्याचा तातडीने शोध लावणं आवश्यक आहेच, पण असे 'स्लिपर सेल' कार्यरत आहेत का, याचा आधी तपास घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget