Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती, मात्र, सध्या त्यांची मजबुरी : संजय राऊत
Maharashtra Assembly Winter Session 2022 : देवेंद्र फडणवीसांना विरोधकांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
Sanjay Raut : विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेकवेळा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधानसभेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मात्र, सत्तेत बसल्यावर विरोधकांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत. देवेंद्रजी तुम्ही एवढे बदलले असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस मनापासून भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम करतील असं मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी असेल असंही राऊत म्हणाले. त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती असल्याचेही राऊत म्हणाले.
आम्ही नागपुरात बॉम्ब फोडू असे म्हणालो होतो. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले की वाती तयार आहेत. अजून अधिवेशन संपलेलं नाही. मुख्य म्हणजे आमच्यासाठी सीमा प्रश्नाचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. सीमाप्रश्नी सरकारने केलेला ठराव हा बुळचट असल्याचे राऊत म्हणाले. त्या ठरावात सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करावा याबाबतचा उल्लेखही नाही. त्यामुळं हा ठराव नसून बेडकांचा डराव असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, आमचा लवंगी फटाका आहे का बॉम्ब याचा निर्णय लागेल, असा इशाराही राऊतांनी दिला.
Maharashtra Assembly Winter Session 2022 : विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होतेय
अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराचा विषय हा काय लंवगी फटाका आहे का? 36 सरकारी जमीन रेवड्या वाटाव्या तशी वाटली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी दिली, हा काय लवंगी फटाका आहे का? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले. विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचं काम करत आहेत. त्यांना बोलून दिलं जात नाही. इतके पक्षपाती अध्यक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्याचं आम्ही कधी पाहिले नसल्याचे राऊत म्हणाले. आता फक्त विधानसभा अध्यक्षांनी खुर्चीवरुन उठूव वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा देणंच बाकी असल्याचं राऊत म्हणाले. अशा स्थितीत बॉम्ब जरी टाकले तरी काही होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपला लढण्याचा पूर्ण इतिहास विसरु नये, भविष्यात या लढ्यासाठी त्यांनी पुन्हा उतरावंच लागणार असल्याचे राऊत म्हणाले.
Maharashtra Assembly Winter Session 2022 : देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा
भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन फार काळ भाजपला राज्य करता येणार नाही. गेल्या तीन दिवसात जी भ्रष्टाचाराची दोन प्रकरण बाहेर काढली त्या काय लवंग्या फटाक्या आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. 16 भूखंडाचा विषय काढला आहे. 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना दिल्याचे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील नैतिक पातळी राखली पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: