एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session:  शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी; विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं?

Maharashtra Assembly Session:  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काहीशा कमकुवत झालेल्या विरोधकांनी आज पहिल्या दिवशी आक्रमकता दाखवली. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली. तर, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधातही ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही आमदार सहभागी झाले नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांच्या गटातील आमदार काही कारणांनी उपस्थित झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे. संविधानाच्या 10 शेड्युलमध्ये जी तरतूद आहेत त्यानुसार आम्ही नोटीस पाठवली असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव आहे. अध्यक्ष किंवा सभापती हे पदावर असताना जर अविश्वास असतो तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांनी खुर्चीवर बसू नये अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेत आम्ही जो अभुतपूर्व असा पेच प्रसंग निर्माण झाला आहें. त्यांच्यासमोर त्यांच्या अपात्रतेची आणि अविश्वास प्रस्ताव  चालू शकत नाही. त्याबद्दल पत्र दिले. त्यांच्या अपात्रतेची आम्ही नोटीस दिली आहे. अडव्होकेट जनरल याच्याकडून मत घेऊन कारवाई करावी. तोवर त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे अशी आमची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज असून, अद्याप 50 टक्के क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, अतिवृष्टी, गारपीट नुकसानीचे अनुदान अजूनही मिळाले नाही. त्यातच बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेत. तर सरकारी टोळी हफ्ते वसुली करतायेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे. आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा व्हायला हवी होती बाळासाहेब थोरात यांनी दुबार पेरणी संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्यांवर त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही आणि विधानसभेचे कामकाज स्थगित झालं असल्याचे विरोधकांनी म्हटले. राज्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात सरकार हे गांभीर्याने पाहत नाही हे यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्यात सत्तेत सहभागी झाली आहे. तर, दुसरीकडे  एक गट अजूनही विरोधी बाकांवर आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. 

दरम्यान, आज विधानसभेत आणि विधान परिषदेत नवनिर्वाचित मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये पहाटे बलात्कारPune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणीPune Crime News :  पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP MajhaUjjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Pune Crime Swargate st depot: नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Embed widget