एक्स्प्लोर

दिल्लीची लाज वाटत असेल तर राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं, नरेश म्हस्केंचा टोला 

एवढीच दिल्लीची लाज वाटसंजय राऊतांना एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं असा टोला म्हस्के यांनी लगावला.  त असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं असा टोला म्हस्के यांनी लगावला.  

Naresh Mhaske on Sanjay Raut : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला गेले होते. त्यांची रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा झाली आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhask) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीच्या फेऱ्या मारणे अशी टीका चुकीची आहे. संजय राऊतांना एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं असा टोला म्हस्के यांनी लगावला.  

काल रात्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे. मंत्रिपद मागितल्याचा चर्चा सकाळपासून सुरू आहेत. तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्र्राचं सुख, समृध्दी आणि भरभराटी मागितली आहे. फक्त राज्याचा विकास आणि समृद्धीबाबत चर्चा झाल्याची माहिती नरेश म्हसके यांनी दिली. राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागत असते. हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे तळवे चाटत असतात, असी टीका देखील नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली. राऊत वाटेल ते बरळत असतात असेही म्हस्के म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

प्रचंड बहुमत असताना सुद्धा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आठ-आठ दिवस लागत आहेत. मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही स्वागत करू. आम्हाला निकाल मान्य नसला तरी आकडे महत्वाचे असतात. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे.  गांधीवादी नेते बाबा आढाव यांना वयाच्या 95 व्या वर्षी आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? पोलीस महासंचालक कोण असेल? मुंबई आयुक्त कोण असाव? हे दिल्लीतून मोदी आणि शाह ठरवत आहेत आणि महाराष्ट्राचे नेतृत्व मान झुकवून उभे आहे. अशी टीका राऊतांनी केली होती.

महायुतीत ते तीन पक्ष एकत्र आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पदाचे वाटप कसे करावे हा त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले तर त्यांच्याकडे काही पर्याय नसेल. त्यांना जे हवे आहे ते मागतील पण मिळालं नाही तरी ते सरकारमध्ये पडून राहतील. भाजपला जे काम करून घ्यायचं होतं ते झालेलं आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. या त्यांच्या टीकेला म्हस्के यांनी प्रतित्युर दिलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Embed widget