एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Konkan Refinery : नाणार रिफायनरी विरोधक नेत्यांची थेट ATS चौकशी; आंदोलकांमध्ये संताप, मागील वर्षी झाली होती चौकशी

Konkan Refinery : कोकणातील रिफायनरी विरोधकांची एटीएसकडून चौकशी झाली असल्याचे समोर आले आहे.

Kokan Refinary : कोकणातील रिफायनरी विरोधातील आंदोलन सध्या गाजतंय. पण, त्याचवेळी आतापर्यंतची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिफायनरी विरोधी आंदोलकांच्या नेत्याची थेट ATS अर्थात दहशतवादी विरोधी पथकानं चौकशी केली आहे. जुलै 2021 ते ऑक्टोबर 2021 या काळात तीन वेळा ही चौकशी झाली आहे. रिफायनरीविरोधी आंदोलक नेत्यांना काही संस्था पैसा पुरवत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही चौकशी करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. सरकारकडून दडपशाहीचा वापर करत असल्याची भावना रिफायनरी विरोधी आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे. या चौकशीत एटीएसला फारशी माहिती आढळून आली नसल्याचेही समजते. 

रिफायनरी विरोधी आंदोलकांची थेट दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या काही नेत्यांच्या विविध संस्थांचीही चौकशी सुरू आहे. त्यांचे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत का? त्यांना काही पैसा पुरवला जात आहे का? या दृष्टीनं सध्या माहिती गोळा केली जात आहे. मागील वर्षी रिफायनरी विरोधी आंदोलनाचे प्रमुख नेते सत्यजीत चव्हाण यांची मुंबईत चौकशी झाली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्याशिवाय, रिफायनरी विरोधी आंदोलनातील आणखी एक प्रमुख चेहरा असलेले प्रमोद जठार यांच्याशी संबंधित संस्थांचीदेखील चौकशी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 

आंदोलकांमध्ये संताप 

थेट दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आल्यामुळे सध्या रिफायनरी आंदोलकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. सरकार दडपशाही करत असल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे. सरकारनं अशा प्रकारे चौकशी करण्यापेक्षा आम्हाला सांगावं आम्ही कधीही, कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत अशी प्रतिक्रिया रिफायनरीविरोधी आंदोलकांनी दिली आहे. 

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. मुंबईतही कोकणवासियांच्या बैठका, आंदोलने झाली. त्याच्या परिणामी नाणारमधील नाणार प्रस्तावित प्रकल्प स्थलांतरीत करावा लागला. आता हा प्रकल्प बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. 

फंडिंगचा आरोप

कोकणातील रिफायनरीला वाढता विरोध सध्या दिसून येत आहे. मोठ्या संख्येनं सध्या नागरिकांना आंदोलन, मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, हे सारं होत असताना रिफायनरीविरोधी आंदोलनाला किंवा आंदोलकांना पैसा कोण पुरवठा करत आहे? याबाबत देखील प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण आंदोलनाला विविध संस्था, त्यामध्ये परदेशातील संस्थांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जात आरोप केले जात होते. स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी यांनी देखील याबाबत प्रश्व उपस्थित केला होता. दरम्यान, राजन साळवी यांनी केलेला आरोप, एटीएसची झालेला चौकशी यामुळे सध्या रिफायनरी विरोधी आंदोलकांमध्ये रोष दिसून येत आहे. सरकार दडपशाहीचा वापर करतंय कि काय? असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे. 

नेत्यांचं काय म्हणणं? 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर 'एबीपी माझा'नं रिफायनरी विरोधी आंदोलनातील मुख्य चेहरा सत्यजित चव्हाण आणि नितीन जठार यांच्या संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, 'एबीपी माझा'शी बोलताना सत्यजित चव्हाण यांनी 'मी दहिरसरला राहतो. माझी तीन वेळा चौकशी झाली. मी पूर्णपणे सहकार्य केलं. पण, त्याबाबत मी पोलिस महासंचालकांकडे तक्रार देखील केली. त्याची दखल घेतली गेली आणि मला क्लिन चीट देखील मिळाली आहे. चौकशीला मी घाबरत नाही. सरकार किंवा यंत्रणांनी बिनधास्त चौकशी करावी. फक्त कुटुंबाला याबाबत काळजी वाटू नये म्हणून मी गप्प होतो. यापुढे देखील आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर 'माझा'नं नितीन जठार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना जठार यांनी 'सध्या माझ्याबाबत देखील चौकशी केली जात आहे. मी काय करतो? कुठं राहतो? व्यवसाय काय? माझे मित्र काय करतात? कोणत्या राजकीय पक्षाशी मी संबंधित आहे? याची चौकशी केली गेली आहे. मी नाणार येथील रिफायनरीविरोधी आंदोलनापासून सक्रीय आहे. त्या समितीचा मी सेक्रेटरी आहे. यापूर्वी देखील मी पोलिसांना सहकार्य केलं आहे. पण, अशा पद्धतीनं चौकशी करण्यात काय अर्थ? आम्हाला केव्हाही बोलवा आम्ही चौकशीला येण्यास तयार आहोत. आम्ही सर्व कागदपत्रं घेऊन येऊ. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी तसं सांगितलं देखील आहे. अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 

राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगांवात होणाऱ्या रिफायनरीला पंचक्रोशीतून तीव्र विरोध आहे. पण. त्याचवेळी समर्थक देखील पुढे सरसावत आहेत. सध्या या भागात रिफायनरी होण्यास योग्य जागा आहे का? त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता होणार आहे का? याची चाचपणी सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget