Jalgoan: पतंग उडवणं जीवावर बेतलं, वीजेचा धक्का लागल्यानं आठ वर्षीय मुलाचा मृत्यू
Jalgoan: ही घटना जळगाव जिल्ह्यातील कुसुमबा गावात घडल्याने आज दुपारच्या सुमारास घडलीय.
![Jalgoan: पतंग उडवणं जीवावर बेतलं, वीजेचा धक्का लागल्यानं आठ वर्षीय मुलाचा मृत्यू Maharashtra: 8-year-old boy falls to death while flying kite in Jalgaon Jalgoan: पतंग उडवणं जीवावर बेतलं, वीजेचा धक्का लागल्यानं आठ वर्षीय मुलाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/13/0686b88a8d2d70c0d4c02e2f201b153a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgoan: पंतग उडवित असताना वीजेचा धक्का लागल्यानं एका आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना जळगाव जिल्ह्यातील कुसुमबा गावात घडल्याने आज दुपारच्या सुमारास घडलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. एकुलता एक मुलगा मयत झाल्याने कुटुंबाचा मोठा आक्रोश या वेळी पाहायला मिळाला आहे
हितेश पाटील (वय, 8) असं मृत मुलाचं नाव आहे. हितेश आज त्याच्या काही मित्रांसह घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्यावेळी त्यांची पंतग घराजवळ असलेल्या वाजेच्या तारांमध्ये अडकला. पतंग काढण्याचा प्रयत्नात हितेशचा पाय वीजेच्या तारेला लागला. ज्यामुळं हितेश जोरात वीजेचा धक्का लागला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.
मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडवताना उच्च व लघू दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर तसे वीज यंत्रणांपासून सावधगिरी बाळगणं आणि विद्युत सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अनेकदा पतंग उडवताना किंवा कटलेलं पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. हे अडकलेलं पतंग काठ्या लोखंडी सळी किंवा गिरगोटच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अशा वेळी अनेकदा विद्युत तारेला स्पर्श होऊन जीवावर बेतू शकतो.
याशिवाय, पतंग उडवताना वापरला जाणारा मांजा अनेकदा तुटून झाडे, इमारती, उड्डाण पूल अशा ठिकाणी अडकून पडतो. त्यामुळं अनेक पक्ष्यांनाही दुखापत होऊन जीव गमवावा लागतो. मांजामुळं गळा कापला जाऊ शकतो. नायलॉन मांजा एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो.
- हे देखील वाचा-
- बार्शीत नुसती 'फटे'चीच चर्चा! कोट्यवधींची फसवणूक अन् मोठी स्वप्न दाखवून आरोपी फरार, गुन्हा दाखल
- पुण्यातल्या बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्र्यांच्या फोन नंबरचा वापर करुन धमकी; 6 जणांना बेड्या
- Crime News : भारताची बॉर्डर क्रॉस करण्याआधीच पोलिसांचा घेराव; 48 तासांत आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)