एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : कोणत्या मतदारसंघातून आज कोणता महत्वाचा नेता उमेदवारी अर्ज भरणार?, पाहा संपूर्ण यादी...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहेत.

Lok Sabha Election 2024 : राज्यात दुसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु असून, आज अनेक महत्वाच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase)  महाराष्ट्रातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बुलढाणा (Buldhana), अमरावती (Amravati), वाशीम (Washim), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola), वर्धा (Wardha) लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

आज कोण भरणार उमेदवारी अर्ज? 

यवतमाळ-वाशिम लोकसभेतून संजय देशमुख उमेदवारी अर्ज भरणार (Sanjay Deshmukh, Yavatmal-Washim Lok Sabha Constituency)

महायुतीच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीचे चर्चेचे गुऱ्हाळ आणि खलबते सुरू असतानाच, आज महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. पोस्टल ग्राउंडवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचे भाषण होणार आहे. 

बुलढाण्यातून रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव उमेदवारी अर्ज भरणार (Ravikant Tupkar and Prataprao Jadhav, Buldhana Lok Sabha Constituency)

आज बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता हजारो शेतकऱ्यांच्या सभेला तुपकर संबोधित करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच शेतकऱ्यांच्या साक्षीने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर साधारणतः दुपारी बारा वाजत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचं महायुतीचा उमेदवार म्हणून, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जाधव हे देखील अर्ज दाखल करण्यापूर्वी एका सभेला संबोधित करणार आहेत. जाधव हे गेल्या तीन लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे जाधव यांच्या उमेदवारी दाखल करताना पक्षाचे कुठलेही वरिष्ठ नेते किंवा मुख्यमंत्री बुलढाण्यात येणार नाहीत. बुलढाणा लोकसभेसाठी आतापर्यंत दोन उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले असून, त्यात शिंदेंच्या शिंवसेनेचे संजय गायकवाड तर दुसरे भाजपा नेते व माजी आमदार विजयराज शिंदे यांचा समावेश आहे.

वर्ध्यातून पवार गटाचे अमर काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार (Amar Kale, Wardha Lok Sabha Constituency)

वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हासाठी माजी आमदार अमर काळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यासाठी आज वर्ध्यात येत आहे. वर्ध्याच्या स्वाध्याय मंदिर येथून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमर काळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचणार आहे. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही रॅली निघणार असून, तुतारी या चिन्हावर लढणारे माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारीसाठी आज मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. 

परभणीतून ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार  (Sanjay Jadhav, Parbhani Lok Sabha Constituency) 

परभणी लोकसभा मतदारसंघात काल महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आज महाविकास आघाडीकडून उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपास्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शनिवार बाजारपासुन रॅली निघुन शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकरी कार्यालयापर्यंत ही रॅली जाणार आहे. तिथे सभेत रूपांतर होईल. या रॅलीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना पक्षाचे खासदार आमदार आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या रॅलीनंतर होणाऱ्या सभेत महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना संजय जाधव यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Lok Sabha Second Phase Election 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून सुरवात; 'या' मतदारसंघाचा समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget