एक्स्प्लोर

टोळधाडीचं नागपुरात पुन्हा आक्रमण, गृहमंत्र्यांनी केली पाहणी

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे. अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा टोळधाडीनं आक्रमण केले आहे. त्यामुळं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास टोळधाड काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये दाखल झाली आणि भाजीपाल्यासह हिरव्या झाडांचे नुकसान केले.याबाबत माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री 10 वाजता त्या भागात जाऊन पाहणी केली. टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे कमीत कमी नुकसान झाले पाहिजे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. टोळधाडीचा आक्रमणापासून होऊ शकणारे पिकांचं नुकसान कमी होण्यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहून धुर करून, फटाके फोडून वा बँड वाजवून टोळधाडीला पळवून लावण्याचा सल्लाही गृहमंत्र्यांनी दिला.

टोळधाडीचा मुंबईला धोका नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार : महापालिका

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे. अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. शेतकऱ्यांचे पीक, फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असे देशमुख म्हणाले.

पाकिस्तानातील टोळधाडीची महाराष्ट्रात एन्ट्री, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं संकट, शेतकऱ्यांना धास्ती

राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून आलं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाहीय. त्यात हे नवीन संकट उभं राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. टोळधाडीचं नागपुरात पुन्हा आक्रमण, गृहमंत्र्यांनी केली पाहणी गेलं वर्षभर राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील महत्वाची पीकं, गहू, मोहरी, कापूस, भाजीपाला पीकांचं मोठं नुकसान झालंय. साधारण साडेआठ लाख एकरवरील पिकांना याचा फटका बसला होता. देशाच्या इतिहासतील सर्वात मोठ्या नुकसानींपैकी एक घटना मानली जाते. यात सर्वाधिक नुकसान राजस्थानमध्ये 33 पैकी 16 जिल्ह्यात, तर मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव झाला. टोळधाडी बद्दल थोडक्यात माहिती
  • सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केलं आहे.
  • सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.
  • ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच कोरोनाची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान राज्य आणि केंद्र सरकारसमोर आहे.
  • सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे
  • लोकस्ट (Locusts ) म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.
  • सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.
  • भारताच्या इतिहासात मोठ्या नुकसान करणाऱ्या 10 टोळधाडींची नोंद आहे.
  • साधारण 35 हजार लोकं किंवा 20 उंट किंवा 6 हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक ही टोळ धाड (अंदाजे 4 कोटी) फस्त करु शकते.
  • FAO म्हणजेच अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसंच सर्व देशांना सावध करत असते.
  • टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget