Raigad Suspected Boat : रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती
Raigad Suspected Boat : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे संशयास्पद आढळलेल्या बोटी प्रकरणी केंद्रीय यंत्रणा लक्ष ठेवून असून स्थानिक पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
मुंबई : ‘रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट (Raigad Suspected Boat ) ही लेडी हान नावाची असून याची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचं इंजिन खराब झालं. बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले आहे. पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. हीच ती बोट असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले आहे. बोटीवरील स्टिकर व कागदपत्रांवरून थेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी ही बोट आमचीच आहे आणि ती ओमानच्या समुद्रात पलटी होऊन वाहून गेल्याची माहिती नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने दिली. केंद्रीय यंत्रणांकडून देखील याबाबत खात्री करण्यात आली आहे. शिवाय बोट जप्त करून तपासण्यात आली असली तरी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निदवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
विधिमंडळात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करून याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या घनेबाबत लक्ष ठेवून असून स्थानिक पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दिलीय.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे संशयास्पद आढळलेल्या बोटी संदर्भातील माहिती कंपनीने देण्यात आली आहे. परंतु, सध्या सणांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानित तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. मुंबईत नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्यभर हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची माहिती समोर आली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. ही बोट आढळून आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या