एक्स्प्लोर
Advertisement
प्रमाणपत्रं वाटलेल्यांची तातडीने कर्जमाफी करा, सरकारचे बँकांना आदेश
दिवाळीमध्ये सुट्ट्या असल्यानं कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकली नाही, हे कारण सरकारने दिल्यानंतर एबीपी माझाने बँकांमध्ये जाऊन माहिती घेतली. तेव्हा हे सत्य समोर आलं.
पुणे : मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. त्यांचीच तातडीने कर्जमाफी करुन टाका, असे आदेश सरकारकडून आल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली आहे. याचाच अर्थ उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणखी कालावधी जाणार असल्याचे संकेतही बँक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दिवाळीमध्ये सुट्ट्या असल्यानं कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकली नाही, हे कारण सरकारने दिल्यानंतर एबीपी माझाने बँकांमध्ये जाऊन माहिती घेतली. तेव्हा हे सत्य समोर आलं.
दिवाळीच्या सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नव्हती. मात्र ती रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. मात्र शनिवारी बँका सुरु असूनही हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा का होऊ शकले नाही, हा प्रश्न आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाच्या हप्त्याचा भरणा केला, ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्यानेही सरकारच्या या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शरद पवारांची टीका
दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा करण्याची घाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम घाईघाईने उरकूनही शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नसल्याचा दावा पवारांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement