एक्स्प्लोर

शेतकऱ्यांवरील आमदारपुत्रांचा साडेतेरा कोटींचा बोजा हटवला

शरद घोलप आणि आनंद मासाळ या शेतकऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांच्या मुलांच्या गहाण खताचा बोजा टाकण्यात आला होता.

पंढरपूर : सोलापुरातील दोन शेतकऱ्यांवर पडलेला आमदार पुत्रांच्या कर्जाचा साडे तेरा कोटी रुपयांचा बोजा 'एबीपी माझा'च्या दणक्यानंतर निघाला. शरद घोलप आणि आनंद मासाळ या शेतकऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांच्या मुलांच्या गहाण खताचा बोजा टाकण्यात आला होता. सोलापुरातील माढ्यामधले आमदार बबन शिंदे यांच्या पुत्रांच्या गहाण खताचा साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दोन शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चढवण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे ही दोन्ही शेतकरी कुटुंबं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांनी साडे तेरा कोटी रुपयाचं वैयक्तिक कर्ज घेतलं. कर्जापोटी आपल्या 6 मालमत्तांचं गहाणखत माढ्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात 17 नोव्हेंबर 2017 रोजी केलं. मात्र प्रशासनाने आमदार पुत्रांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढण्याच्या ऐवजी माढ्यातील दोन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर हा साडे तेरा कोटी रुपयाचा बोजा चढवला. याबाबत आमदार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला कोणतीच माहिती नसल्याचंही समोर आलं. मात्र आपल्याकडून झालेली चूक मान्य करुन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी दुय्यम निबंधक कार्यालय आणि प्रशासन या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली होती. सर्वच ठिकाणाहून निराश झालेल्या शरद घोलप आणि आनंद मासाळ या दोन शेतकऱ्यांनी अखेर 'एबीपी माझा'शी संपर्क साधला होता. आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर या प्रकरणाची तपासणी करताना यात दुय्यम निबंधक कार्यालय आणि तहसील विभागाकडून अक्षम्य चूक झाल्याचं निदर्शनाला येताच 'माझा'ने या दोन शेतकऱ्यांची वेदना समोर आणली. ज्यांच्या शेतात पोटापुरतं पिकतं अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा आल्याने ही दोन्ही कुटुंबं पुरती हादरुन गेली होती. याचा जाब अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी चूक कबूल केली. 'माझा'च्या बातमीनंतर वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर तातडीने माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे आणि प्रांताधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची झालेली चूक दुरुस्त करत या दोन्ही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चढलेला साडेतेरा कोटींचा बोजा हटवला आणि त्यांचा उतारा कोरा झाला. तहसील कार्यालयाकडून कागदपत्रे हातात पडताच दोन्ही कुटुंबं सुखावली. आपल्या डोक्यावरचे आणि उताऱ्यावरचे दोन्ही ओझी 'एबीपी माझा'मुळे उतरवल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget