(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Live Updates Raj Thackeray: राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार? खेडमधील सभेचे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स...
Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या खेडमधील सभेचे लाईव्ह अपडेट्स....
LIVE
Background
Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) पार पडत आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पक्ष बांधणी, विस्तारासाठी कोकण दौरा केला होता. त्यावेळी आपण येत्या काळात सभा घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
राज ठाकरे खेडमध्ये काय बोलणार?
दुसरीकडे राज ठाकरे यांची सुद्धा सभा आज खेडमध्ये होत आहे. राज ठाकरे पक्षबांधणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दौरा करत आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आज सभा पार पडत आहे. खेडमधील सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारसू रिफायनरीवर अधिकृतपणे कोणतीही भूमिका राज ठाकरे यांनी घेतली नसली तरी आज स्पष्टपणे बोलण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राज्य सरकार या मुद्यावरून आमनेसामने आले असताना मनसे काय भूमिका घेणार? याबाबत राज ठाकरे कोणते आवाहन करतात का? याकडे सुद्धा लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी एका माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार आणि सध्याच्या राजकारणावर भाष्य करणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे या सभेकडे राज ठाकरे काय बोलणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
उद्धव यांचीही महाडमध्ये सभा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज महाडमधील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून रणकंदन सुरु आहे. बारसूमध्ये आंदोलन करत असलेल्या स्थानिकांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलगावमध्ये स्थानिक ग्रामस्थांची भेट घेत त्यांची मते जाणून घेतली. बळाचा वापर करणार असाल, तर रिफायनरीला आमचा कडाडून विरोध असेल, आम्ही स्थानिकांसोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. त्यांनी कातळशिल्पला भेट देत पाहणी केली. जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Khed Rally: कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा
Raj Thackeray Khed Rally: इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Khed Rally: कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा
Raj Thackeray Khed Rally: इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Khed Rally: पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल
Raj Thackeray Khed Rally: कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.
Raj Thackeray Khed Rally: राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा पुतळ्याला विरोध
Raj Thackeray Khed Rally: माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला. 2014 च्या आधी तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचं नाव घेत नाही आणि हे मला बदनाम करणार.
Raj Thackeray Khed Rally: माझा कोकणी माणूस तसाच राहिला
Raj Thackeray Khed Rally: दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचं मला खूप वाईट वाटतं,राग येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते पेशव्यानी पूर्ण केलं ते म्हणजे आपला भगवा झेंडा अटकेपार फडकवला म्हणजे कुठे थेट पाकिस्तानमधल्या अटक किल्ल्यापर्यंत फडकवला. म्हणजे काय केलं तर जमीन ताब्यात घेतली. थोडक्यात जमिनीचं महत्व कमी लेखू नका.