एक्स्प्लोर
एल्गार परिषद प्रकरण, राज्य सरकारने केंद्रीय यंत्रणांना सहकार्य न केल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा धोका : सुधीर मुनगंटीवार
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- 40 टक्क्यांहून अधिक जनता ठाकरे सरकारवर असमाधानी, एबीपी - सी व्होटरच्या सर्व्हेची आकडेवारी, मात्र आता लोकसभा निवडणुका झाल्यास राज्यात एनडीएऐवजी यूपीएला यश
- प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवभोजन थाळीचा शुभारंभ, राज्यभरातल्या सव्वाशे केंद्रावर 10 रुपयांत पूर्ण जेवण, माझावर पाहा शिवभोजन केंद्राची यादी
- मुंबईत आजपासून नाईट लाईफला सुरुवात, मॉल्स, थिएटर, हॉटेल्स पहाटेपर्यंत सुरु राहणार, तर मुख्यमंत्र्यांकडून पहिल्या मुक्त पक्षी विहार दालनाचंही लोकार्पण
- खासदार जलिल यांच्याविरोधात याचिका करणाऱ्याला एमआयएम कार्यकर्त्यांकडून मारहाण, तिरंगा रॅलीत राडा, झेंड्याचा अपमान केल्यानं मारहाण केल्याचा जलिलांचा दावा
- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात नऊ हजार ग्रामपंचायतींचा ठराव, ठाकरे सरकारला मोठा धक्का, फडणवीसांच्या काळात सुरु झालेली पद्धत ठाकरे सरकारकडून बंद
- मराठवाड्याच्या पाण्यासाठी पंकजा मुंडे आजपासून उपोषणाला बसणार, औरंगाबाद विभागीय आयुक्तालयासमोर करणार उपोषण, भाजपचे दिग्गज नेते उपोषणात होणार सहभाग
23:43 PM (IST) • 27 Jan 2020
एल्गार परिषद प्रकरण, राज्य सरकारने केंद्राच्या यंत्रणांना सहकार्य केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा धोका, राज्यपालांना या प्रकरणात लक्ष घालावं लागेल, राज्यात यामुळे पुन्हा निवडणुका लागू शकतात, सुधीर मुनगंटीवार प्रतिक्रिया
23:17 PM (IST) • 27 Jan 2020
अंबरनाथ : उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी
21:35 PM (IST) • 27 Jan 2020
खंडणी अपहरण आणि मारहाण प्रकरणातून उदयनराजे भोसले यांची निर्दोष सुटका, सातारा जिल्हा न्यायालयाकडून सर्व आरोपींची सुटका, उदयनराजेंसह 12 जणांवर खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, सोना अलाईन्स कंपनी व्यवस्थापक राजीव कुमार जैन यांनी केलेली तक्रार
20:01 PM (IST) • 27 Jan 2020
एल्गार परिषद प्रकरणाची कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी एनआयएची टीम पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात दाखल, एल्गार प्रकरणाचा पुढील तपास एनआयए करणार
19:22 PM (IST) • 27 Jan 2020
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयाबाहेर 100 हून अधिक वकिलांचं शांततापूर्ण आंदोलन, 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत वकिलांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा, राम आपटे, उदय वारुंजीकर, सुभाष घडागे यांच्यासारख्या जेष्ठ वकीलांचा सहभाग
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement