एक्स्प्लोर
चंद्रपूरात खाद्यतेलाच्या डब्यांतून दारुची तस्करी
नागपूरमधून खाद्यतेलाच्या डब्यातून दारू चंद्रपूरला नेली जात होती. पोलिसांनी याप्रकरणी धनंजय शास्त्रकार आणि कमलाकर वलदे या दोन आरोपींना अटक केली.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हात दारू तस्करीसाठी खाद्य तेलाच्या डब्यांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. नागपूरमधून खाद्यतेलाच्या डब्यातून दारू चंद्रपूरला नेली जात होती. पोलिसांनी याप्रकरणी धनंजय शास्त्रकार आणि कमलाकर वलदे या दोन आरोपींना अटक केली. दारुसाठी वापरले जाणारे तेलाचे डबे व्यवस्थित पॅकिंग केले जात असल्यामुळे कोणालाही या तस्करीचा संशय येत नव्हता. मात्र पोलिसांना दारू तस्करीच्या या अनोख्या पद्धतीची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे रामनगर पोलिसांनी दवाबाजार परिसरातील एका घरावर छापा मारला. रामनगर पोलिसांनी तेलाच्या डब्यात ठेवलेली जवळपास 70 ते 80 पेट्या दारू जप्त करत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हात अशी अनोखी शक्कल वापरुन दारु तस्करी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
आणखी वाचा























