एक्स्प्लोर
Advertisement
“शेती मुख्य व्यवसाय, तरी खडसेंकडे एवढी संपत्ती कशी?”
मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलेले हे पत्र जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याच लेटरहेडवरुन पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून आपल्याला आणि खडसेंना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला आहे.
जळगाव : माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती कशी आली, याची चौकशी करा, असं पत्र मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलेले हे पत्र जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याच लेटरहेडवरुन पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून आपल्याला आणि खडसेंना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला आहे.
याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली आहे. तक्रारीनंतर त्यांना आता हायकोर्टाचे न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पत्राबाबात माहिती द्यावी लागणार आहे.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement