एक्स्प्लोर

Laxman Hake Car Attack: मोठी बातमी: लक्ष्मण हाकेंच्या कारवर नगरमध्ये जमावाचा काठ्यांनी हल्ला, गाडीच्या काचा फुटल्या अन्...

Laxman Hake Car Attack: लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Laxman Hake Car Attack: ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. 

घडली कशी घटना? (Laxman Hake Car Attack)

आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभा साठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.

हल्ल्यामुळे वाहनाचे नुकसान (Laxman Hake Car Attack)

या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट (Laxan Hake Facebook Post)

दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर भावनिक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो," असे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आधी राज्य करायला शिका, तुम्ही काय शेणं खाताय ते बोला, पूर्वी कोणी काय केलं त्यावर बोलू नका; संजय राऊतांचा जोरदार पलटवार

Nashik Crime News : तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget