एक्स्प्लोर

लातूरमध्ये नवरा-बायकोचा वाद विकोपाला, पुतण्या आणि भाच्याचा बळी

लातूर शहरातील भांबरी चौक इथे भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे पती-पत्नी राहतात. मागील अनेक दिवसापासून यांच्यात प्रचंड वाद आणि भांडण होते. वादाचं पर्यावसन बऱ्याच वेळेस हाणामारीतही झालं होतं. याबाबत पती-पत्नीने अनेक वेळा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तकारही दिल्याची माहिती आहे.

लातूर : दुहेरी हत्याकांडाने लातूर शहर हादरलं. शहरातील भांबरी चौकात बुधवारी (28 ऑगस्ट) एक धक्कादायक घटना घडली. नवरा-बायकोचा वाद विकोपाला गेला आणि त्यात दोघांचा खून झाला. लातूर शहरातील भांबरी चौक इथे भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे पती-पत्नी राहतात. मागील अनेक दिवसापासून यांच्यात प्रचंड वाद आणि भांडण होते. वादाचं पर्यावसन बऱ्याच वेळेस हाणामारीतही झालं होतं. याबाबत पती-पत्नीने अनेक वेळा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तकारही दिल्याची माहिती आहे. 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा वाद विकोपाला गेला होता. यानंतर ललिता चव्हाणने आपला भाऊ बालाजी राठोडला फोन करुन बोलावून घेतलं होतं. बालाजी राठोडने आपल्याबरोबर आपले मित्र आणि नातलगही आणले होते. याची माहिती मिळताच भीमा चव्हाणनेही वरवंटी या गावावरुन आपले नातलग बोलवले, यात त्याचा भाचा आणि पुतण्याचा समावेश होता. भीमा चव्हाण यांच्या भांबरी चौक इथल्या घरासमोर प्रचंड भांडण झालं. वादावादी आणि हाणामारीचा प्रकारही घडला. यात भीमा चव्हाण यांचा पुतण्या आनंद आणि भाचा अरुण यांचावर प्राणघातक हल्ला झाला. चाकूचा जीवघेणा वार झाल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याची पथक तिथे तात्काळ दाखल झालं. लातूरसारख्या शहरात दुहेरी हत्याकांड झाल्याने पोलिस विभाग खडबडून जागा झालं. आरोपांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकं पाठवली होती. या घटनेतील दोन-तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही वेळात ताब्यात घेतलं. उर्वरित आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. मृतदेह लातूरच्या सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, भीमा चव्हाण हा लातूर येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करत होता तर ललिता चव्हाण एमआयडीसीमध्ये चहाची टपरी चालवत असे. या पती-पत्नीला दोन मुली, दोन मुले आहेत. परंतु या नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये दोन जणांचा हकनाक बळी गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

Embed widget