एक्स्प्लोर

वडिलांचा मृत्यू लेकापासून लपवण्यासाठी माऊलीचा आटापिटा

उदगीर (लातूर) : वडिलांचं निधन झाल्याचं अपघातग्रस्त मुलाला कळू नये म्हणून आटापिटा करणाऱ्या एका माऊलीला पाहून कोणाचंही मन हेलावेल. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधल्या या आईने एका डोळ्यातले अश्रू लेकासाठी लपवले आहेत. 48 वर्षांच्या शेजमजूर उषाबाई लखनगावे... विधवा होऊनही कपाळावर भलं मोठ्ठ कुंकू लावतात. हातात बांगड्या भरतात. मुलासमोर दुःखाचा उमाळा येऊ नये, म्हणून भरलेले डोळे एकांतात पुसतात. डोळे पुसून पुन्हा मुलाच्या सेवा-सुश्रुषेसाठी येतात. 20 मार्चला अमोलच्या कंबरेवरुन ट्रँक्टरचं चाक गेलं. कंबरेपासूनचा भाग लुळा पडला. अमोलच्या अपघातावेळी उषाबाई काशीला गेलेल्या, परतल्यावर पोराच्या अपघाताची बातमी कळली. उषाबाई दवाखान्यात आल्या. मात्र मुलाच्या उपचाराच्या चिंतेनं अमोलच्या वडिलांनी 27 मार्चला आत्महत्या केली. पतीच्या निधनानं उषाबाई खचल्या. पण एकमेव मुलाला पुन्हा पायावर उभ्या करण्यासाठी कामाला लागल्या. कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या कायम राहिल्या. अमोलवर उपचार करणाऱ्या लाईफ केअरनही उपचाराचा खर्च निम्म्यावर आणला आहे. अमोल पुन्हा सामान्य होऊ शकणार नाही, मात्र 80 टक्के बरा होईल, असं डॉक्टर सांगतात. या शेतमजूर कुटुंबात 3 कर्त्या हातांपैकी दोघांचे हात कमवायचं थांबले आहेत. अमोलच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. अशा या जिद्दी आईला सलाम करत महाराष्ट्रानं मन मोठं करायला हवं. त्यांना भरभरुन मदत करायला हवी. उषाबाईंना मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील रुद्रानी हेल्थकेअर सर्व्हिसेस लिमिटेड  बँक ऑफ इंडिया पुणे कॉर्पोरेशन बँकिंग शाखा पुणे अकाऊण्ट नंबर : 052130110000055 ifsc code : BKID0000521 उषाबाई नागनाथ लखनगावे स्टेट बँक ऑफ इंडिया देवनी शाखा, जिल्हा लातूर ब्रांच कोड : 3812 अकाऊण्ट नंबर : 32202314524 Ifsc code : SBIN0003812 वडिलांचा मृत्यू लेकापासून लपवण्यासाठी माऊलीचा आटापिटा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget