एक्स्प्लोर
Advertisement
लो प्रोफाईल IAS, जी श्रीकांत यांच्या नोटीस बोर्डला लातूरकरांचं लाईक्स!
लातूर: आयएएस अधिकारी जी श्रीकांत हे नेहमीच त्यांच्या कौतुकास्पद कर्तृत्त्वामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर लावलेली पाटी चर्चेचा विषय ठरली आहे.
जी श्रीकांत यांची नुकतीच लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दालनासमोर एक पाटी लावली आहे. यावर त्यांनी त्यांचा नंबर दिला आहे.
पाटीवरील संदेश
"मी दौऱ्यावर असताना, भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा MESSAGE टाकावा आणि निवेदन असल्यास व्हॉट्सअप वर टाकावे. भ्रमणध्वनी क्रमांक 9921044466" - जी श्रीकांत
जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या या संदेशामुळे त्यांनी रुजू होताच लातूरकरांची मनं जिंकली आहेत. श्रीकांत यांनी तीनच दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी विविध आढावा बैठकांना सुरुवात केली आहे.
ड्रायव्हरसाठी स्वत: बनले ड्रायव्हर
जी श्रीकांत हे लातूरला येण्यापूर्वी अकोल्याचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी 33 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 33 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द कलेक्टर जी श्रीकांत ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं.
अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत गाडी चालवत आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक ऐटीत मागे बसलेत, असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं.
निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर!
संबंधित बातम्या
अकोला : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा 'शांताबाई' गाण्यावर ठेका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement