Car Accident : भरधाव वेगात कार थेट हॉटेलमध्ये घुसली, रस्त्यात येईल त्याला उडवलं, दोन जण जागीच ठार, CCTV त थरार कैद
Car Accident : लातूर सोलापूर महामार्गावरील औसा येथील घटना असून हॉटेलमधील सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
Car Accident : वेळ सकाळची, हॉटेलमध्ये काही लोक नाश्ता करण्यासाठी बसले होते, पण क्षणार्धात असं काही होईल, याची कल्पना कोणालाच नव्हती, एक कार अत्यंत भरधाव वेगात आली, आणि अचानक होत्याचं नव्हतं करून गेली. एका कार वरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट हॉटेलमध्ये घुसली. तर या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. लातूर-सोलापूर महामार्गावरील औसा येथील घटना असून हॉटेलमधील सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. ज्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलमध्ये शिरली...
आज शनिवार, सकाळच्या वेळी औसा जवळील सीएनजी पंपावरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. लातूर कडे येणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे हॉटेलमधील नाश्त्यासाठी आलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. हा अपघात अतिशय भयानक होता. या अपघातात कार मधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. औसा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
दोन जणांचा जागीच मृत्यू, तर तिघांवर उपचार सुरू
औसा इथून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. तर या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. तीनही व्यक्तींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारा पाठवण्यात आले आहे.
लातूर शहरात हळहळ व्यक्त
राजाजी टेलर्सचे संचालक वाजीद खान पठाण आणि राजासाबजी टेलर्सचे संचालक सोहेल शेख यांचे या अपघातात निधन झाले आहे.. उमरहा येथे गेलेल्या जावई सोहेल शेख यांना हैद्राबाद येथून घेऊन येत असताना हा अपघात झालं आहे.या अपघातात कार मधील तीन महिला आणि कारचा चालक जबर जखमी झाले आहेत. कार ज्यावेळी हॉटेल मध्ये धडकली त्यावेळी त्या ठिकाणी काम करणारा एका मुलास ही जबर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. घटनेचे माहिती लातूर शहरात कळल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केलं जात आहे. वाजीद खान पठाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई, सून, नातू असा परिवार आहे तर सोहेल शेख यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, 2 भाऊ असा परिवार आहे.
वाहनचालकांनो! वेग नियंत्रित ठेवा
समृद्धी महामार्गावरील आज सकाळी कार अपघात झाला, या महामार्गावरील अपघातांच्या मालिकेचं सत्र वाढत असून आणखी एक भीषण अपघात घडला, महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर, अन्य दोन गंभीर जखमी असल्याची घटना घडली, ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ घडली.
हेही वाचा>>>