एक्स्प्लोर
लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू
रेल्वे स्थानकावरुन आलेल्या प्रवाशांना घेऊन एक क्रूझर गाडी लातूरला येत होती. त्यात चालकासह दहा जण होते.
लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा गावाजवळ पहाटे साडेचारला हा अपघात झाला.
रेल्वे स्थानकावरुन आलेल्या प्रवाशांना घेऊन एक क्रूझर गाडी लातूरला येत होती. त्यात चालकासह दहा जण होते. या वाहनाने कोळपा गावाजवळील एका पुलाशेजारी उभ्या असलेल्या टेम्पोला समोरुन जोरात धडक दिली. याच वेळी समोरुन येत असलेल्या दुसऱ्या क्रूझर गाडीलाही धडक बसली.
यात क्रूझर छत पूर्ण फाटलं आणि गाडीचा चक्काचूर झाला. त्यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. यासोबत दुसऱ्या क्रूझरमधील नऊ जण जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विजय पांदे, तुकाराम दळवे, उमाकांत कासले, मीना कासले, शुभम शिंदे, मनोज शिंदे आणि दत्तू शिंदे अशी मृतांची नावं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement